शिंदे गटातील आमदाराचे कार्यालय फोडणाऱ्या २३ जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात मोठे बंड केले. या बंडानंतर शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे आमदार मंगेश कुडाळकर हे शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. शिवसैनिकांनी मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. याप्रकरणी कुडाळकर यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन कुर्ला पोलिसांनी शिवसैनिकांवर कारवाई करण्यास सुरवात केली असल्याची माहिती आता समोर आली आहे.  

एकनाथ शिंदे यांच्या गटात कुडाळकर गेल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी कुडाळकर यांच्या कुर्ला येथील कार्यालयावर हल्ला केला होता. आक्रमक शिवसैनिकांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेत मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या बॅनर्सची तोडफोड केली होती. या तोडफोडीचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.

मंगेश कुडाळकर यांनी आपल्या नावाच्या फलकाची मोडतोड करणाऱ्याविरोधात पोलिसाकडे तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी २३ शिवसैनिकांविरोधात नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe