विखे पाटलांच्या एका फोन कॉलमुळे थांबले आंदोलन आणि मिळाले १ कोटी रुपये

Published on -

१४ मार्च २०२५ श्रीरामपूर : अशोकनगर फाटा ते अशोकनगर हा रस्ता गेल्या ३० वर्षापासून दुरुस्त होत नसल्याने अशोकनगर रस्ता संघर्ष समितीच्या वतीने सामुहिक मुंडण आंदोलन पुरकारले होते. मात्र, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आठ दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून दोन टप्प्यात या रस्त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन दिले.

त्यानंतर हे मुंडण आंदोलन स्थगित करण्यात आले.अशोकनगर फाटा ते अशोकनगर या रस्त्यासाठी अशोकनगर, निपाणी वडगाव, मातापूर ग्रामस्थांनी गुरुवारी अशोकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कै. भास्करराव गलांडे पा. यांच्या स्मारकास अभिवादन करून सार्वजनिक बांधकाम विभागावर मोर्चा काढला. अशोकनगरहून हा मोर्चा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर पोहोचल्यानंतर तेथे सभा झाली.

यावेळी ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.या कार्यालयासमोर मुंडण करण्यापूर्वी संघर्ष समितीच्या कार्यकत्यांनी यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत पूजन केले.यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ, श्रेष्ठ कार्यकत्यांनी मुंडण आंदोलन स्थगित करण्याची विनंती समितीला केली. परंतु गेल्या ३० वर्षात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे आंदोलन करण्यावर समिती ठाम राहिली.

त्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना फोन लावला. त्यानंतर माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्व ग्रामस्थांसमोर फोनवर संवाद साधून सदर रस्त्याच्या प्रस्तावास मंजुरी येईपर्यंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून दोन टप्प्यात एक कोटी रूपये देण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.

तसेच येत्या आठ दिवसात या रस्त्याचे काम सुरु होईल,असे आश्वासन मोबाईलवरून दिले.त्यानंतर हे मुंडण आंदोलन स्थगित करण्यात करण्यात आले.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सचिन गुजर, कॉ. बाळासाहेब सुरूडे, कॉ. मदीना शेख, डॉ. सुनिता गायकवाड, माजी सरपंच वनिता राऊत, बाळासाहेब उंडे, प्रवीण लोळगे, प्रवीणराजे शिंदे, मिराताई पारधे, दीपाली चित्ते, विष्णुपंत राऊत,

अशोकराव बोरुडे, बी. जी. गायधने, शरद दोंड, अनिल गायके, गणेश गायधने, अजिंक्य उंडे, मुरलीधर राऊत, भाऊसाहेब सोनवणे, सदा कराड, योगेश जाधव, जगन्नाथ खाडे, शिवाजी गोरे, प्रवीणराजे शिंदे, सर्जेराव देवकर, बाळासाहेब ढोरमारे, बाळासाहेब मेटे, नाना मांजरे, अक्षय राऊत, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब पवार, विलास जाधव, लक्ष्मण लोखंडे, विजय तिवारी, बाबासाहेब साळवे, आनंदा क्षीरसागर, चंद्रकांत काळे,

टोनी सेठी, किशोर घोरपडे, अनिल उंडे, संपत राऊत, दत्ता डोंगरे, रावसाहेब उंडे, अजय कदम, भाऊसाहेब सावंत, शिवाजी दोंड, जालिंदर उंडे, ओंकार जगताप, साजिद पठाण, बाळासाहेब पिपळे, ताराचंद नवगिरे, बंडू वाघमारे, शाम आकसाळ, रवींद्र बडाख, वसंतराव उंडे, राजेंद्र देवकर, रोहन शेळके, देविदास साळवे, सागर आगे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News