शिक्षकांना सफारी तर महिला शिक्षिकांना सोन्याची नथ ! ‘नाशिक शिक्षक’ची निवडणूक वेगळ्याच वळणार? पहा..

सध्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांनी महाराष्ट्रातील वातावरण तापलेले आहे. प्रचार शिगेला पोहोचला असतानाच आता उमेदवारांकडून मतदार शिक्षकांना विविध आमिषे दाखविण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. शिक्षिकेला पैठणी, सोन्याची नथ आणि शिक्षकाला सफारीचे कापड यांचे राजरोस वाटप होत असल्याचा आरोप

Published on -

सध्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांनी महाराष्ट्रातील वातावरण तापलेले आहे. प्रचार शिगेला पोहोचला असतानाच आता उमेदवारांकडून मतदार शिक्षकांना विविध आमिषे दाखविण्यात येत असल्याचे पुढे आले आहे.

शिक्षिकेला पैठणी, सोन्याची नथ आणि शिक्षकाला सफारीचे कापड यांचे राजरोस वाटप होत असल्याचा आरोप ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची दखल घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाने मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात त्वरीत चौकशी करण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नाशिक शिक्षक मतदारसंघात सफारी कापड, नथ वाटप होत असल्याची चर्चा होती. याबाबत विविध वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी थेट केंद्र व राज्याच्या निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील आचार संहिता कक्षाचे प्रमुख तथा उपायुक्त प्रज्ञा बडे-निसाळ यांनी नाशिक,

अहमदनगर, जळगाव, नंदूरबार आणि धुळे अशा पाचही जिल्ह्यातील सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना रविवारी (दि. २३) सदर वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षक मेळाव्यांच्या नावाखाली जोरदार जेवणावळीही सुरू असल्याची चर्चा आहे. धनदांडग्या उमेदवारांकडून सुरू असलेला हा प्रकार मात्र, अनेक शिक्षकांना रुचलेला नसून त्यांनी यला विरोध दर्शविला आहे.

शिक्षक आहोत याचे तरी भान ठेवा
ही निवडणूक शिक्षक आमदार साठी होत आहे. शिक्षकांचे प्रश्न सुटावेत यासाठी शिक्षणाचा एक प्रतिनिधी आमदार म्हणून आवाज उठवेल यासाठी ही निवड असते. परंतु सध्या या निवडणुकीने वेगळेच वळण घेतले आहे. शिक्षक सोडून वेगळेच राजकीय वळण लागले आहे. त्यात आता पैठणी, सोन्याची नथ आणि शिक्षकाला सफारीचे कापड अशा वाटपाच्या आरोपामुळे शिक्षक आहोत याचे तरी भान ठेवा असे म्हणण्याची वेळ आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe