आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्यातील 50 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मंजुरी ! मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार होणार ‘हे’ रस्ते

कोपरगाव मतदार संघातील सर्वच गावांमधील रस्ते हे चांगल्या दर्जाचे बनलेले आहेत. एवढेच नाही तर नागरिकांच्या माध्यमातून ज्या रस्त्यांच्या विकासाची मागणी जोर धरत होती त्या रस्त्यांसाठी देखील आता आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Tejas B Shelar
Published:
Aamdar Aashutosh Kale News

Aamdar Aashutosh Kale News : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील ग्रामीण भागातील बहुतांशी रस्त्यांचा प्रश्न हा मार्गी लागला आहे. आमदार काळे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील रस्ते अगदीच चकाचक झाले आहेत.

कोपरगाव मतदार संघातील सर्वच गावांमधील रस्ते हे चांगल्या दर्जाचे बनलेले आहेत. एवढेच नाही तर नागरिकांच्या माध्यमातून ज्या रस्त्यांच्या विकासाची मागणी जोर धरत होती त्या रस्त्यांसाठी देखील आता आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव मतदारसंघातील जवळपास 50 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मान्यता मिळाली असून लवकरच या रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत.

यामुळे मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होणार आहे. गावागावांमधील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. यामुळे कोपरगाव मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास होईल आणि शेतकऱ्यांना या रस्त्यांचा मोठा लाभ होईल अशी आशा आहे.

दरम्यान, आता आपण आमदार काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव मतदारसंघातील कोणकोणत्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोपरगावमधील ‘या’ रस्त्यांचे काम पूर्ण होणार !

राज्य महामार्ग ते कारवाडी रस्ता 3.47 किलोमीटर
संवत्सर, कासली शिरसगाव रस्ता 10.50 किलोमीटर
जळगाव शेळके वस्ती वाकडी ते धनगरवाडी ते दिघी तालुका हद्द रस्ता 8. 14 किलोमीटर
नपावाडी ते पुणतांबा रस्ता 1.91 किलोमीटर
शिंगवे ते नथू पाटलाची वाडी रस्ता 6.46 किलोमीटर
वारी ते जिल्हा हद्द रस्ता खोपडी 3.75 किलोमीटर
टाकळी ते ब्राह्मणगाव रस्ता 3.92 किलोमीटर
उक्कडगाव ते तळेगाव मळे रस्ता 7. 50 किलोमीटर
तळेगाव मळे ते खोपडी रस्ता 5.25 किलोमीटर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe