Aditya Thackeray : सध्या ठाकरे गटाचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या लग्नाबाबत चर्चा केली जात आहे. यावरून आता शिवसेनेचे नेते प्रतोद भरत गोगावले यांनी जोरदार टीका केली आहे. 32 वर्षाच्या मुलाचं काय सांगायचं? आमच्यात एवढ्या वयापर्यंत कोणी थांबत नाही.
30 व्यावर्षीच आम्ही लग्न लावून देतो. आता 32 वर्षे झालं तरी लग्न लागत नाही. तर काय बोलायचं त्याला? त्यावर न बोललेलं बरं, असे म्हणत त्यांनी हिनवले आहे. यामुळे ठाकरे गट देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिंदे साहेबांचा नाद कोणी करू नये.
मग 32 वर्षाचा असो की 36 वर्षाचा असो. 30 वर्षाच्या आत सर्व काही व्यवस्थित व्हायला हव होतं. पण आता होत नाही तर आम्हाला बघावे लागेल, असेही ते म्हणाले. तसेच अधिवेशनावरून देखील त्यांनी टीका केली आहे.
ते म्हणाले, नियमाप्रमाणे व्हीप बजावला आहे. कारवाई म्हणून नाही. त्यामुळे कुणाला अडचण होणार नाही. दोन आठवड्यानंतर कोर्ट जो आदेश देईल. त्यानुसार निर्णय घेऊ, असेही भरत गोगावले म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावल्याचे भरत गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यापर्यंतचा आदेश दिला आहे. एक आठवडा आज संपतोय. एक आठवडा राहतोय, असेही ते म्हणाले.