Aditya Thackeray : आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे. त्यांच्या सभांना देखील मोठी गर्दी होत आहे. असे असताना आदित्य ठाकरे यांच्या अंगातील ‘ब्ल्यू शर्ट’ची चर्चा पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे नेहमी ‘ब्ल्यू शर्ट’चं का घालतात? असा अनेकांना प्रश्न पडत आहे.
आज पत्रकाराने त्यांना हा प्रश्न विचारून बोलते केलेच. या प्रश्नाचे उत्तर खुद्द आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. म्हणाले की, मला हा कलर खूप आवडतो. कुणी सांगितले म्हणून घातला असे मनात आणू नका, माझं टेन्शन वाढवू नका. आवडीचे असल्याने खूप वर्षांपासून घालतो. कधी पांढरा तर कधी निळा असा शर्ट घालत असतो असे आदित्य ठाकरे म्हणाले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/02/ahmednagarlive24-Capture-56.jpg)
दरम्यान, आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात सभा घेत आहे. परंतु या काळात आदित्य ठाकरे यांच्या अंगात असलेल्या शर्टचा कलर काही बदलत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे नेहमी ‘ब्ल्यू शर्ट’चं का घालतात? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बिडकीन येथील सभेत तब्बल 25 अधिकारी आणि 200 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता. त्यांच्यावर हल्ला होईल, असेही अनेकांनी सांगितले होते, म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी, पैठणच्या बिडकीन, पाटोदा आणि खुलताबाद येथील नंद्राबाद येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना उत्तर दिले आहे.