ब्रेकिंग : माजी मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, अर्धांगवायू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज

84 वर्षाचे भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली असल्याचे वृत्त हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज 15 ऑक्टोबर सकाळी राजूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा धक्का बसला. यामुळे ते अत्यवस्थ झालेत. ब्रेन स्ट्रोकचा धक्का बसल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Published on -

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरसहित संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेले नगरचे भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. 84 वर्षाचे भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली असल्याचे वृत्त हाती आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज 15 ऑक्टोबर सकाळी राजूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा धक्का बसला. यामुळे ते अत्यवस्थ झालेत. ब्रेन स्ट्रोकचा धक्का बसल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचासाठी ऍडमिट करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांनी सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतं आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की नाशिक येथील रुग्णालयांत दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली. प्राथमिक तपासणीनंतर पिचड यांना पॅरॅलिसिस अर्थातच अर्धांगवायू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तथापि, सध्या त्यांची प्रकृती ही स्थिर बनलेली आहे. त्यांचे कुटुंबीय आणि माजी आमदार वैभव पिचड हे देखील रुग्णालयात उपस्थित आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मधुकरराव पिचड यांनी 1980 ते 2004 या काळात अकोले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

ते सलग सात वेळा अकोले विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरवात राष्ट्रवादी काँग्रेस मधून झाली असून 2019 मध्ये त्यांनी आपले पुत्र वैभव पिचड यांच्या समवेत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे.

पण गेल्या काही दिवसापासून पिचड पिता-पुत्र पुन्हा घरवापसी करतील अशा चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद चंद्र पवार साहेबांची नुकतीच भेट सुद्धा घेतली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe