Ahilyanagar City Politics : गेल्या पाच वर्षांमध्ये अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या पुढाकाराने शहरात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही शहरात अनेक विकासकामे सुरु असून आगामी काळात ही कामे पूर्ण होणार आहेत.
दरम्यान, आंबेडकरी समाजाने आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या कामाचा गौरव केला आहे. बौद्ध समाजाने आमदार जगताप यांचा नुकताच सत्कार केला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शहरातील सावेडी गावठाण येथील बौद्ध समाजाची शमशानभूमी ही फारच मोडकळीसं आली होती. या स्मशानभूमीची अवस्था गेल्या अनेक वर्षापासून बिकट झाली होती.
यामुळे स्मशानभूमीचे नूतनीकरण होणे आवश्यक होते. या स्मशानभूमी मध्ये पत्र्याचे शेड नव्हते, अहो येथे साधी बसण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती.
यामुळे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात नागरिकांचे मोठे हाल होत असत. प्रेत दहन करताना या भागातील आंबेडकरी समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
त्यामुळे या भागातील आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्याकडे स्मशानभूमीच्या नूतनीकरणाबाबत पाठपुरावा सुरू झाला. महत्वाचे म्हणजे जगताप यांना आंबेडकरी समाजाची ही अडचण समजल्यानंतर त्यांनी लगेचच या प्रकरणात ॲक्शन घेतली.
त्यांनी तातडीने समशानभूमीच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करावी असे आदेश दिले. यानंतर येथे पत्र्याचे शेड उभारून देण्यात आले. आता येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण झाले असल्याने या भागातील आंबेडकरी समाजात प्रसन्न वातावरण तयार झाले आहे.
त्यामुळे या लोकांची मोठी सोय झाली आहे. दरम्यान आपली अडचण सोडवल्याबद्दल जगताप यांचा बौद्ध समाजाने सत्कार केला आहे. या भागातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा मोठा सत्कार करण्यात आला आहे.