आपल्याला नावे ठेवणाऱ्यांचे निळवंडे धरणासाठी कवडीचेही योगदान नाही; आमदार बाळासाहेब थोरात यांचा जोरदार हल्ला

यावेळी निळवंडे धरणावरून आमदार थोरात यांनी विरोधकांवर प्रखर टीका केली आहे. पुढे बोलताना थोरात यांनी या धरणाचे पाणी खालच्यांना द्यायचे तसेच वरच्या लोकांनाही द्यायचे अशी आपली भूमिका आहे. ते म्हणालेत की, मध्य प्रदेशातील हरिपुरासारखा पॅटर्न येथे राबविण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे.

Tejas B Shelar
Published:
Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : उद्या भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण तापलेले आहे.

राजकीय नेत्यांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. अशातच संगमनेरचे विद्यमान आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेचा एक कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब थोरात यांची हजेरी लागली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्याकडे होते. यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणावरून विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

आमदार थोरात यांनी या कार्यक्रमावेळी बोलताना अनेक अडचणींवर मात करीत आपण निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले आहेत. निळवंडे धरण बनवताना आपण आदर्श पुनर्वसन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या धरणासाठी आपण स्वतःची जमीन सुद्धा दिली आहे. मात्र शेजारच्यांनी त्यांची एक गुंठाही जमीनही दिली नाही.

म्हणून जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या या धरणाचे काम कोणी केले हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे असं म्हणत आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला नाव ठेवणाऱ्यांचे निळवंडेसाठी कवडीचे ही योगदान नाही, असे विधान केले आहे.

यावेळी निळवंडे धरणावरून आमदार थोरात यांनी विरोधकांवर प्रखर टीका केली आहे. पुढे बोलताना थोरात यांनी या धरणाचे पाणी खालच्यांना द्यायचे तसेच वरच्या लोकांनाही द्यायचे अशी आपली भूमिका आहे. ते म्हणालेत की, मध्य प्रदेशातील हरिपुरासारखा पॅटर्न येथे राबविण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे.

म्हणून बोल घेवड्यांच्या मागे न लागता काम करणाऱ्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग चांगल्यासाठी केला आहे. मात्र गत दोन वर्षापासून आपल्याकडे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सत्ता आणि पैशांचा काहींना गर्व आणि अहंकार आला आहे. तो उतरविण्याचे काम आपण केले पाहिजे अन चांगले आणि वाईट काय हे आपण ठरविले पाहिजे. आपल्या तालुक्याची संस्कृती जपण्याचे काम आपण केले पाहिजे. सध्या, भोजापुर चारीसाठी ज्यांचे काही योगदान नाहीत ते येऊन भाषणे करतात.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या निमित्ताने बनवाबनवीचा कार्यक्रम चाललाय, असं म्हणतं बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना फैलावर घेतले आहे. त्यामुळे सध्या थोरात यांच्या या विधानाची अहिल्यानगर मध्ये चर्चा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe