Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपातील आर्थिक ‘देवाणघेवाण’ चव्हाट्यावर ; पैसे घेऊनच कामे? आ. संग्राम जगतापांमुळे..

Published on -

अहिल्यानगर महानगरपालिका ही नेहमीच विविध गोष्टींनी चर्चेत राहते. आयुक्त जावळे यांच्या लाचप्रकरणामुळे तर मनपा राज्यात गाजली. दरम्यान महानगरपालिकेतील काही विभाग हे पैशांशिवाय काम करत नाहीत असा आरोप अनेकदा सर्वसामान्य करत असतात. परंतु आता हा मुद्दा थेट विधिमंडळात समोर आणला गेलाय. आ. संग्राम जगतापांमुळे अनेक प्रश्नांना वाचा फुटणार आहे.

त्याच झालं असं की, महापालिकेतील नगररचना विभागातील गैरकारभाराचा मुद्दा थेट विधिमंडळात उपस्थित करत आ. जगताप यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी तडजोडीशिवाय नगररचना विभागात फाईल पुढे जात नाही, अशी गंभीर तक्रार केली आहे. आ. जगताप यांनी नगर महापालिकेचा कारभार थेट विधीमंडळात उपस्थित करून चव्हाट्यावर आणला आहे. नगर रचना विभागाद्वारे नागरिकांची होत असलेली पिळवणूक यानिमित्ताने राज्यभरात पोहोचली आहे.

मनपाचे माजी नगरसेवक संपत बारस्कर व अजिंक्य बोरकर यांनी याआधी नगररचना विभागातील अनागोंदी चव्हाट्यावर आणली होती. आता तर थेट आ. जगताप यांनी विधीमंडळातच वाभाडे काढल्याने या गंभीर प्रकरणाची राज्य सरकारने तातडीने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

आर्थिक तडजोडी, लाचखोरीमुळे महापालिकेचा नगररचना विभाग कायम चर्चेत राहिला आहे. आ. जगताप यांनी नगररचना विभागातील गैरकारभार थेट राज्य सरकारच्या निदर्शनास आणला आहे. विधिमंडळात महापालिकेतील समस्यांचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी नगररचना विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांशी तडजोड केल्याशिवाय फाईल पुढे जात नाही, अशी गंभीर तक्रार केली आहे. त्यामुळे राज्य सरकार व महापालिका आयुक्त काय दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रत्येक महानगरपालिकेतील नगररचना विभागाबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. नगररचना विभागात गेलेली फाईल कधीच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी तडजोड केल्या शिवाय पुढे जात नाही. या समस्येवरही शासनाने बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे, अशा मागण्या आ. संग्राम जगताप यांनी यावेळी केल्या. दरम्यान यावेळी त्यांनी मनपामधील भरती आणि शहरातील अग्निशमन यंत्रणा याविषयीही महत्वपूर्ण मुद्दे मांडले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe