Ahilyanagar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अहिल्यानगर जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी सज्ज

Published on -

अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांमध्ये तरुण पिढीला काम करण्याची अधिक संधी आहे. मात्र राजकारणापासून लोक लांब जात आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय बैठका आयोजित करून तरुणांना पक्षासोबत जोडण्याचे आपण काम करून पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून आढावा बैठक घेऊन पक्षाची ताकद वाढवणार व पक्षामध्ये आपापसातील मतभेद आहे ते संपून एक मताने व एक विचाराने सर्व जाती-धर्माच्या लोकाना पक्षासोबत जोडण्याचे काम करू, असे मत जिल्हा प्रभारी माजी आमदार अशोक बापू पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालय राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निरीक्षक अंकुश काकडे, खासदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्षे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, रामेश्वर निमसे, सिताराम काकडे, सुरज मोरे, महेंद्र शेळके,

विजयसिंह गोलेकर, अशोक बाबर, सुरेश गडाख, हरिदास शिर्के, जावेद शेख, बाबा तरटे, बाबा भिटे, शौकत तांबोळी, किसनराव लोटके, अथर खान, शिवशंकर राजळे, रघुनाथ काळदाते, मच्छिद्र सोनवणे, प्रकाश पोटे, सतीश थोरात, सुधीर मस्के, विशाल म्हेत्रे, विनोद साळवे, फारूक रंगरेज, आरिफ पटेल आदींसह सर्व तालुकाध्यक्षशहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, फ्रंटल सेलचे प्रमुख, सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

१ लाख ३० हजार मतदान आले कुठून

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले की, निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडले त्याच्या देखील निवडणुकांवर फरक झाला व नगर जिल्ह्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पाच महिन्याच्या आतमध्ये १ लाख ३० हजार मतदान आले कुठून व वाढले कसे याला अनेक गोष्टी कारणीभूत आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर चळवळीच्या विचारावर चालणारा पक्ष हा जातीयवादी पक्षाच्या नादी लागत नसून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात पक्ष बळकटीकरण करणार असल्याचे सांगितले.

जिल्हा शरदचंद्र पवार यांच्यावर प्रेम करणारा…

खासदार लंके म्हणाले की, आपला जिल्हा शरदचंद्र पवार यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे व आपला कार्यकर्ता कितीही संकटात असला तरी त्याला ताकद देण्याची गरज आहे व येणाऱ्या काळात युवकांना मोठ्या प्रमाणात पक्षात काम करण्याची संधी भेटणार असून युवकांना पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात जोडणार असल्याची भावना व्यक्त केली.

कार्यकत्यांसाठी सदैव पाठीशी उभा

निरीक्षक अंकुश काकडे म्हणाले की, पक्षाचे ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कुटीबद्ध राहून प्रत्येक कार्यकत्यांनी आपला पक्ष कसा वाढवता येणार यासाठी प्रयत्न करावे व पक्ष देखील कार्यकत्यांसाठी सदैव पाठीशी उभा राहणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकाध्यक्ष यांनी यापुढील अधिक सक्रीय काम करून पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन काकडे यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News