अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी ‘या’ चार जागांवर अजित पवार गटाचा उमेदवार ! काळे, जगताप, लहामटे फिक्स पण चौथा कोण ?

अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत 37 उमेदवारांची नावे असतील आणि यामध्ये अहिल्यानगर मधील चार विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचा समावेश राहण्याची शक्यता आहे. खरे तर महायुतीने सीटिंग गेटिंग हा फॉर्म्युला आणला आहे. विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे ती जागा त्याच पक्षाला देण्याचा हा फॉर्म्युला आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावर खलबत सुरू आहे. अजून महायुती आणि महाविकास आघाडीने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

मात्र लवकरच दोन्ही गटांकडून उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत. अशातच, काल विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. अर्थातच आता राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे लवकरच महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत.

त्या आधीच मात्र महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या अजितदादा गटाकडून एक मोठी अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गट लवकरच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असून या पहिल्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील चार उमेदवारांचा समावेश राहणार असल्याचा दावा केला जात आहे.

अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत 37 उमेदवारांची नावे असतील आणि यामध्ये अहिल्यानगर मधील चार विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचा समावेश राहण्याची शक्यता आहे. खरे तर महायुतीने सीटिंग गेटिंग हा फॉर्म्युला आणला आहे.

विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे ती जागा त्याच पक्षाला देण्याचा हा फॉर्म्युला आहे. यानुसार, अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघ, कोपरगाव विधानसभा मतदारसंघ आणि अकोले विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे.

यासोबतच पारनेरची जागा देखील अजित पवार गटालाच मिळणार आहे. कारण की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर नगर शहरातील आमदार संग्राम जगताप, अकोलेचे डॉ. किरण लहामटे, कोपरगावचे आशुतोष काळे आणि पारनेरचे निलेश लंके हे अजितदादांसोबत गेले होते.

मात्र, लोकसभेच्या तोंडावर लंकेंनी घरवापसी करत शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा लढवली आणि ते विजयी झालेत. तेव्हापासून पारनेरची जागा रिक्त आहे. दरम्यान पारनेर ची जागा ही महायुतीकडून अजित पवार यांच्या गटालाच मिळण्याची शक्यता आहे.

स्वतः अजित पवार यांनीच ही माहिती दिली आहे. पारनेर मधून अलीकडेच अजित पवार गटात सामील झालेले सुजित झावरे यांना उमेदवारी मिळू शकते. अजित पवार यांनीच हे संकेत दिले आहेत. अर्थातच नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार पाहायला मिळणार आहेत.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात संग्राम जगताप, कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आशुतोष काळे, अकोले विधानसभा मतदारसंघात किरण लहामटे अन पारनेर विधानसभा मतदारसंघात सुजित झावरे यांना अजित पवार गटाकडून यावेळी उमेदवारी मिळू शकते असा दावा होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe