Ahilyanagar Politics : अखेर कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आपली रणनीती यशस्वी ठरवत बाजी मारली असून, रोहित पवारांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या समर्थक उमेदवार प्रतिभा भैलुमे यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्यामुळे रोहिणी घुले यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.
या घडामोडीमुळे शिंदे यांची राजकीय पकड अधिक बळकट झाली असून, पवार गटासाठी हे वाईट दिवस सुरू होण्याचे संकेत मानले जात आहेत. स्थानिक राजकारणात या पराभवाचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीतुन प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला, यामुळे रोहीनी सचिन घुले यांचा कर्जत नगरपंचायती च्या नगराध्यक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रतिभा भैलुमे यांनी निवडणूकीतुन माघार घेतल्याचे समजताच घुले समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदाची निवडणूक दोन मे रोजी होणार होती, यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बाजुने रोहीनी सचिन घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर आमदार रोहित पवार यांच्या बाजूने प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
आज २९ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, अखेर आज प्रतिभा भैलुमे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला यामुळे रोहीनी सचिन घुले या कर्जत नगरपंचायती च्या नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे, आता दोन मे रोजी औपचारिक घोषणा होणार आहे, प्र
तिभा भैलुमे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीतून माघार घेतली हे समजताच भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, प्रविण घुले व सचिन घुले समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कर्जत नगरपंचायतीचे तेरा नगरसेवक सहलीला गेले आहेत