अहिल्यानगर जिल्ह्यात विखे, जगताप, राजळे, लहामटेसह अनेकांचे उमेदवारी अर्ज दाखल ! तुमच्या मतदारसंघात कोणी-कोणी भरलेत अर्ज ? पहा….

महाविकास आघाडी कडूनही आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या तिन्ही घटक पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. यानंतर शिवसेना शिंदे गटाने आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे सार्वजनिक केलीत.

महाविकास आघाडी कडूनही आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल अर्थात 24 ऑक्टोबरला अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेसाठी गुरुपृष्यामृतच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

काल जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, राणी लंके यांच्यासह 34 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे काल इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्जही नेले आहेत. यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 विधानसभा मतदारसंघात आणखी काही अर्जदारांची संख्या वाढणार आहे.

काल शिर्डीतून भाजपतर्फे राधाकृष्ण विखे पाटील, अकोलेतून अजितदादा गटाकडून आ. लहामटे, शेवगाव- पाथर्डीतून भाजपतर्फे आ. राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अ‍ॅड. प्रताप ढाकणे, जनशक्तीतर्फे हर्षदा काकडे, राहुरीतून भाजपतर्फे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, नगर शहरातून अजितदादा गटाचे आमदार संग्राम जगताप, पारनेरमधून शरद पवार गटातर्फे राणी लंके, श्रीगोंद्यातून माजी आमदार राहुल जगताप यांनी अर्ज दाखल केले आहेत.

निवडणूक कधी होणार?

यंदा विधानसभा निवडणूका एका टप्प्यातच होणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

यामुळे सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संपूर्ण राज्यात इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू आहे. महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe