राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार ठरलेत ! ‘या’ 52 जागांवर निर्णय झाला, अहमदनगर जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात पडणार उमेदवारीची माळ ?

Tejas B Shelar
Published:
Ahmedanagar News

Ahmedanagar News : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यावेळी निवडणुकीच्या रिंगणात कोण दिसणार? याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

खरे तर शरद पवार गट हा महाविकास आघाडीचा एक भाग आहे. अजून महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे फायनल केलेली नाहीत. सध्या महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या तिन्ही गटांमध्ये म्हणजेच काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट या तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारी बाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

येत्या काही दिवसात महाविकास आघाडीची पहिली यादी प्रसिद्ध केली जाईल अशी शक्यता आहे. तत्पूर्वी मात्र शरद पवार गटाच्या संभाव्य 52 उमेदवारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संभाव्य उमेदवारांची देखील नावे आहेत.

दरम्यान आज आपण शरद पवार गटाकडून उभ्या राहणाऱ्यां या संभाव्य उमेदवारांची माहिती पाहणार आहोत. शरद पवार गटाने अजून आपल्या उमेदवारांची नावे अधिकृतरित्या जाहीर केलेली नाहीत. मात्र खालील नावे ही शरद पवार गटाकडून चर्चेत आहेत.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि त्यांचा विधानसभा मतदारसंघ

अहमदनगर शहर – अभिषेक कळमकर, डॉ. आठरे
कर्जत-जामखेड – रोहित पवार
श्रीगोंदा – राहुल जगताप
राहुरी – प्राजक्त तनपुरे
शेवगाव-पाथर्डी – प्रतापराव ढाकणे
पारनेर – राणी लंके
अकोले – अमित भांगरे
कोपरगाव – विवेक कोल्हे
इंदापूर – हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने,अप्पासाहेब जगदाळे
दौंड – आप्पासाहेब पवार, नावदेव ताकवणे
खडकवासला – सचिन दोडके
हडपसर – प्रशांत जगताप, योगेश ससाणे
भोसरी – विलास लांडे, अजित गव्हाणे
आंबेगाव – देवदत्त निकमशिरुर
हवेली – आमदार अशोक पवार
आळंदी – अतुल देशमुख
जुन्नर – शरद लेंडे, अनंतराव चौगुले, तुषार थोरात, मोहित ढमाले
पुरंदर – संभाजीराव झेंडे
मोहोळ– राजू खरे, अभिजित ढोबळे, रमेश कदम, संजय क्षीरसागर
सांगोला -दीपक साळुंके, बाबासाहेब देशमुख, दत्तात्रय सावंत
बार्शी – दिलीप सोपल, प्रभाताई झाडबुके
माढा – रणजित शिंदे, रणजित मोहिते
माळशिरस – उत्तमराव जानकर
राधानगरी-भुदरगड – केपी पाटील, एवाय पाटील
वडगाव शेरी – बापू पठारे
वाळवा-इस्लामपूर – जयंत पाटील
तासगाव – रोहित पाटील
शिराळा – मानसिंह नाईक
आष्टी-पाटोदा – राम खाडे
परळी – राजाभाऊ फड, बबन गीते, फुलचंद कराड
बीड – संदीप क्षीरसागर
केज – पृथ्वीराज साठे, नवनाथ शिंदे
माजलगाव – नारायण डक, मनोहर डाके
अहमदपूर – विनायकराव पाटील
परांडा – राहुल मोटे
घनसावंगी – राजेश टोपे
काटोल – अनिल देशमुख
येवला – अमृता पवार (पक्षप्रवेश बाकी)
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मावळ – बाळा बेगडे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe