Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये जे घडलं त्याने मोदी शहा सुद्धा टेन्शनमध्ये जातील ! भाजप कार्यकर्त्यानीच केली गावात…

Ahmednagarlive24
Published:

मोदी सरकार एकीकडे आपल्या लोकसभेसाठी निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यासाठी त्यांच्या विविध योजना जनतेला समजाव्यात यासाठी विकसित भारत रथाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन स्क्रीनवर विविध विकासकामांची माहिती दिली लोकांना दाखवली जात आहे.

दुसरीकडे शेतकरी मात्र विविध कारणांमुळे संतप्त असून सरकारचा निषेध व्यक्त करत आहे. आता याचा फटका विकसित भारत यात्रेला बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये नाटेगाव येथील शेतकऱ्यांनी या संकल्प रथापुढे कांदे ओतून सरकारचा निषेध नोंदवला.

गावात या रथाला एंट्री दिली गेली नाही. या रथाला माघारी संतप्त शेतकऱ्यांनी माघारी पाठवलं आहे. एका भाजपच्या पदाधिकारी असलेल्या शेतकऱ्याने देखील सरकारला घरचा आहेर देत या रथाला गावात एंट्री करून दिली नाही.

विकसित भारत रथाला भाजप कार्यकर्त्याच आडवा

सरकारी कर्मचारी असो की उद्योगपती यांसाठी हे सरकार चांगले निर्णय घेत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत या सरकारचे निर्णय चुकीचे आहेत. कांदा निर्यात बंदी असो की इतर काही कारणे असोत असे निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे सर्वांचे मत आहे.

मी भाजपचा कार्यकर्ता असलो तरी देखील आज शेतकऱ्यांनी संकल्प रथाला जे विरोध केलाय व आंदोलनाचा पवित्रा घेतलाय मी त्याला पाठिंबा देत आहे असे भाजप कार्यकर्ते तथा शेतकरी गोरक्षनाथ मोरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजप कार्यकर्ते देखील या निषेधावेळी शेतकऱ्यांच्या बरोबरीने होते.

शेतकऱ्यांच्या घोषणांनी गाव दुमदुमलं

केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात शुल्क लावल्याने व इतर काही निर्णयांमुळे मोदी सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उद्योगपती तुपाशी शेतकरी उपाशी, केंद्र शासनाचं धोरण शेतकऱ्यांचं मरण आदी घोषणा दिल्या. एका भाजपच्या पदाधिकारी असलेल्या शेतकऱ्याने देखील सरकारला घरचा आहेर देत या रथाला गावात एंट्री करून दिली नाही.

काय केले शेतकऱ्यांनी आरोप ?

मोदी सरकार दहा वर्ष झाले सत्तेत आहे. मोदी सरकारने या बळीराजाला इतक मारणी घातलं की, २१ वेळेस कांद्याच्या भावाला हे सरकार आडवे आले असून कांद्यावर निर्यात शुल्क लावून निर्यात बंदी करुन वेळोवेळी असे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले असा आरोप केला गेला. हे शासन आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर काही करतो असे दाखवण्याचे फक्त काम करत असल्याचा घणाघात यावेळी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe