Ahmednagar News : या हंगामात गाळपास येणाऱ्या उसास इतर चांगले कारखाने जो भाव देतील, तो गणेशला येणाऱ्या उसास देऊ. गणेशचा हा हंगाम निर्विघ्न पार पडेल. गणेशचे कर्ज जिल्हा बँकेने मंजूर केले; पण ऐनवेळी थांबविले;
परंतु न्यायालयाने न्याय दिला. जिल्हा बँक ही राजकारण करण्याची जागा नाही. बँकेने राजकारण न करता गणेशला कर्ज द्यावे, असे प्रतिपादन गणेशचे मार्गदर्शक माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी के

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या हंगामातील गाळप हंगामाचा शुभारंभ सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, साकुरी संस्थानच्या कन्या माधवीताई गुरुगोदावरी व कन्यावृंद यांच्या हस्ते विधीवत पुजनाने व आमदार बाळासाहेब थोरात व संजिवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे याच्या उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकून झाला.
त्याप्रसंगी आमदार थोरात बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधिर तांबे, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव दंडवते, सुधिर म्हस्के, काँग्रेसचे सचिन गुजर, डॉ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, जयराज दंडवते, अॅड. पंकज लोंढे, सुरेश थोरात, सचिन चौगुले, श्रीकांत मापारी,
अनुप दंडवते, नितीन सदाफळ, संगमनेरचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, संजिवनीचे जनरल मॅनेजर दिवटे, गणेशचे कार्यकारी संचालक नितीन भोसले यांच्यासह गणेशचे सर्व संचालक मंडळ, सभासद, शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश चालेल, हंगाम यशस्वी करेल, कितीही विघ्न येऊ द्या, सभासद, शेतकरी, कामगार आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे गणेश हा हंगाम यशस्वी करेल. गणेशसमोर रोज नवीन अडचणी येतात, पण आम्ही त्याचा निपटारा करतो. गणेशसाठी उस कमी आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी, सभासदांनी गणेश कारखान्याला आपला ऊस दिला पाहिजे. ऊस भावाची काळजी करु नका, गणेश ही चांगली संस्था आहे. ती टिकविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. राजकारण न करता गणेश पुढे न्यायचा असल्याचे आमदार थोरात म्हणाले.
संजिवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले, गणेशचा हा हंगाम आव्हानात्मक आहे. अडचणींवर मात करत आलो. बँकेचे मंजुर असलले कर्ज मिळाले नाही. सहकारी साखर कारखानदारीचा पाया ज्यांनी रचला, त्यांच्या वारसदारांनी संकुचित विचार ठेवून एखादी संस्था किंवा सहकार चळवळ कशी मोडीत निघेल,
यासाठी बारिकपणाने लक्ष घालतात. आम्हाला कोर्टात जावे लागले. वकिलांची फौज उभी करावी लागली. नुकताच कोटांत गणेशच्या बाजुने पहिला निकाल लागला, असे ते म्हणाले.
यावेळी महंत रामगिरी महाराज, साकुरी संस्थानच्या कन्या माधवीताई गुरुगोदावरी यांनी अशिर्वाद दिले. सुत्रसंचालन कार्यकारी संचालक नितीन भोसले यांनी केले. आभार विजय दंडवते यांनी मानले.