लांडे खून प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या ! कोतकर पुन्हा नगरच्या राजकारणात एंट्री घेणार; आता साक्षीदार शंकर राऊत काय करणार ?

संदीप कोतकर हे पुन्हा एकदा नगर शहराच्या राजकारणात आणि नगर शहरात येणार अशा चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर पकडला आहे. दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर लांडे खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार शंकर राऊत हे आज आपली भूमिका जनतेसमोर मांडणार आहेत. यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अहमदनगर शहरातील लांडे खून प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या होणार असे चित्र तयार होत आहे. कारण की या खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार शंकरराव राऊत आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे पुन्हा लांडे खून प्रकरणाच्या आठवणी ताज्या होण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत राऊत नेमके काय सांगतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

खरेतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाची धूम नगर शहरात देखील होती. याच गणेशोत्सवाच्या काळात लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप कोतकर हे नगर शहर विधानसभा मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत उभे राहणार अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर वेगाने वायरल झाल्या होत्या.

या चर्चांना तेव्हा अधिक बळ मिळाले जेव्हा संदीप कोतकर यांच्या गणपती मंडळाने शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केलं. संदीप कोतकर यांचे मोठमोठे बॅनर्स शहरात लावण्यात आले. यामुळे तेव्हापासून संदीप कोतकर हे नगर शहराच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

संदीप कोतकर हे पुन्हा एकदा नगर शहराच्या राजकारणात आणि नगर शहरात येणार अशा चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर पकडला आहे. दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर लांडे खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार शंकर राऊत हे आज आपली भूमिका जनतेसमोर मांडणार आहेत.

यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे. दरम्यान आज आपण लांडे खून प्रकरण नेमके काय आहे? याबाबत सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे आहे लांडे खून प्रकरण?

शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक भिमराज लांडे यांचा मे 2008 मध्ये खुन करण्यात आला. मात्र या गुन्ह्याची पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नाही. यामुळे या घटनेचे साक्षीदार शंकरराव राऊत यांनी थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

यानंतर खऱ्या अर्थाने लांडे खून प्रकरण संपूर्ण नगर जिल्ह्यात प्रकाश झोतात आले. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर या घटनेची पोलिसांनीही दखल घेतली. सप्टेंबर 2013 मध्ये या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. उच्च न्यायालयाने पुढे हे प्रकरण नाशिक न्यायालयाकडे वर्ग केले.

यात भानुदास कोतकर, नगरचे माजी महापौर संदीप कोतकर, सचिन व अमोल कोतकर यांच्यासह एकूण १५ जणांवर दोषारोप पत्र दाखल झाले. पुढे नाशिक न्यायालयात या खटल्याची पूर्ण सुनावणी झाली आणि सहा जणांना दोषी ठरवण्यात आले.

या प्रकरणात भानुदास कोतकर आणि त्यांच्या तीन मुलांना दोषी ठरवत प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि जन्मठेपेची शिक्षा मिळाली. पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली भानुदास कोतकर यांना तीन वर्षे सक्त मजुरीची अन तीन हजार रुपये दंडाची शिक्षा मिळाली.

याशिवाय स्वतःजवळ शस्त्र बाळगल्या प्रकरणी स्वप्निल पवार आणि वैभव अडसूळ या दोघांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मध्यंतरी मात्र भानुदास कोतकर यांना वैद्यकीय कारणाने जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर भानुदास कोतकर यांच्या तिघा मुलांना टप्प्याटप्प्याने जामीन मिळाला. पुढे सचिन कोतकर यांची नगर जिल्हा बंदी उठवण्यात आली.

मात्र अजूनही भानुदास, अमोल आणि संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी उठवण्यात आलेली नाही. असे असतानाच मात्र आता संदीप कोतकर नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार शंकरराव राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सध्या संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe