राजकीय भूकंप ! तनपुरेंचे ३ विश्वासू विखे गटात

अहमदनगरच्या राजकारणात अनेक चढउतार अनेक घडामोडी सुरु आहेत. विधानसभेच्या अनुशंघाने अनेक नाट्यमय घडामोडी अहमदनगरच्या राजकारणात पाहायला मिळतील.

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe tanapure

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या राजकारणात अनेक चढउतार अनेक घडामोडी सुरु आहेत. विधानसभेच्या अनुशंघाने अनेक नाट्यमय घडामोडी अहमदनगरच्या राजकारणात पाहायला मिळतील.

परंतु आता त्याआधीच एक राजकीय घडामोड झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडालीय. तनपुरे गटाचे तब्बल ३ सदस्य विखे गटामध्ये दाखल झालेत.

अधिक माहिती अशी : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळामधील तनपुरे गटाचे ३ सदस्य विखे गटामध्ये दाखल झाल्याने अल्पमतामध्ये आलेल्या चेअरमन स्नेहलता दिलीप शिरसाठ व व्हा. चेअरमन प्रभाकर जाधव यांनी पदाचे राजीनामे दिले.

कोल्हार खुर्द सोसायटीची अडीच वर्षांपूर्वी निवडणूक झाली. अनिल शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली तनपुरे गटाचे ७ तर राहुरी पंचायत समितीचे माजी उप सभापती दिगंबर शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील विखे गटाचे ६ सदस्य निवडून आले होते.

यामुळे तनपुरे गटाने अडीच वर्षे सत्ता उपभोगली, परंतू तनपुरे गटातील सुप्त संघर्ष वाढल्याने अखेर त्याचा विस्फोट राजीनामे देण्यात झाला. दिलीप घोगरे, प्रकाश चिखले व संजय भोसले या तिघांनी तनपुरे गटाला सोडचिट्ठी देत विखे गटाला साथ दिली.

परिणामी विखे गटाचे बहुमत झाल्याने चेअरमन व व्हा. चेअरमन यांना पदावरुन पायउतार करण्यासाठी अविश्वास ठराव दाखल करण्याचे ठरले.

यामुळे संख्याबळ अल्पमतामध्ये आल्याचे लक्षात येताच चेअरमन स्नेहलता शिरसाठ व प्रभाकर जाधव यांनी अविश्वास ठराव दाखल होण्यापूर्वीच पदाचे राजीनामे दिल्याने अविश्वास ठरावाची वेळच ओढवली नाही अशी माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe