अहमदनगर जिल्हा बँकेच्या नोकर भरतीवरून मोठा वाद पेटणार ? नोकर भरतीतून आरक्षण वगळले, कारण….

सध्या अहमदनगर जिल्हा बँकेवर राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाची सत्ता आहे. यामुळे या संदर्भात या दोघांना विचारणा होणे आवश्यक आहे. मात्र प्रसार माध्यमांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता या दोघा नेत्यांच्या माध्यमातून मौन बाळगले गेले.

Tejas B Shelar
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील नवयुवक तरुणांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या पदभरती बाबत विचारणा केली जात होती. जिल्हा बँकेची भरती अखेर जाहीर कधी होणार हाच प्रश्न तरुणांकडून उपस्थित होत होता. अखेर कार अहमदनगर जिल्हा बँकेने विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नोकर भरती जाहीर केली आहे.

याची अधिसूचना देखील बँकेने निर्गमित केली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जिल्हा बँकेत रिक्त असणाऱ्या विविध पदांच्या 700 जागा भरण्यासाठी ही नोकर भरती आयोजित करण्यात आली आहे.

त्यामुळे नक्कीच जिल्ह्यातील नवयुवक तरुणांचे नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा पुराशी बाळगून असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मात्र याच जिल्हा बँकेच्या नोकर भरती वरून आता मोठा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खरे तर जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची जाहिरात नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आली. या जाहिरातीत जिल्हा बँकेने या नोकर भरतीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण लागू राहणार नाही असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणजेच या भरतीतुन आरक्षण वगळण्यात आले आहे.

खरे तर याआधी जिल्हा बँकेने नोकर भरती काढली होती तेव्हा वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ देण्यात आला होता. मग यंदा जाहीर करण्यात आलेल्या या 700 हून अधिक जागांसाठीच्या भरतीमध्ये आरक्षण का नाही असा प्रश्न आता उमेदवारांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय.

सध्या अहमदनगर जिल्हा बँकेवर राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाची सत्ता आहे. यामुळे या संदर्भात या दोघांना विचारणा होणे आवश्यक आहे. मात्र प्रसार माध्यमांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता या दोघा नेत्यांच्या माध्यमातून मौन बाळगले गेले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब देखील या प्रकरणावर भाष्य करण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे आता बात निकली है तो दिल्ली तलक जायेगी अशी परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यात नव्हे-नव्हे तर अख्ख्या देशात वाद पेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या नोकर भरतीत आरक्षण वगळले गेले याचे पडसाद आता अहमदनगर जिल्ह्यात तर पाहायला मिळतीलच मात्र महाराष्ट्रात अन संपूर्ण भारतात याचे तीव्र पडसाद उमटतील.

यामुळे आता या नोकर भरती मध्ये आगामी काळात काही सुधारणा होते का? यासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून काय स्पष्टीकरण दिले जाते या गोष्टी पाहण्यासारख्या ठरणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe