Ahmednagar News : सॉलिसिटर गुलाबराव शेळके व जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन अॅड. उदय शेळके यांनी त्यांच्या कार्य काळात जी. एस. महानगर बँक व जिल्हा सहकारी बँकेत पदाधिकारी म्हणून काम करताना सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे.
त्याच पद्धतीने आपण जी. एस. महानगर बॅक आणि जिल्हा सहकारी बँकेत सर्वसामान्य जनतेला पाठबळ देऊन सॉलिसिटर शेळके आणि उदय शेळके यांचे उर्वरित स्वप्न पूर्ण करू, अशी ग्वाही नगर जिल्हा सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालक गीतांजली उदयराव शेळके यांनी दिली.
जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन अॅड. उदयराव शेळके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर संचालक पदाची जागा रिक्त झाली. या रिक्त जागेवर श्रीम. शेळके यांची बिनविरोध निवड झाली, या वेळी त्या बोलत होत्या.
माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांच्या भाची आहेत. या निवडीबद्दलपारनेर तालुक्यातील मान्यवरांबरोबरच मळगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कवाद, निघोज ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद,
कन्हैय्या दुग्ध परिवाराचे अध्यक्ष शांताराम लंके, मच्छिद्र लंके, मळगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठल कवाद, ग्रामपंचायत सदस्य सुधामती कवाद, पत्रकार सुरेश खोसे, अमृता रसाळ व इतर शेळके यांचे अभिनंदन केले आहे.