‘सत्तर दिवसांनी विधासनभा, सत्ता हातात..’ नगरच्या अकोलेतील सभा शरद पवारांनी गाजवली, मोदींसह विरोधकही धुतले, पहा..

दोनच दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली व त्यानंतर लगेचच शरद पवार हे अहमदनगर व नाशिक दौऱ्यावर निघाले. आज शुक्रवारी ते अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून अकोलेत आहेत.

Published on -

Ahmednagar Politics : दोनच दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली व त्यानंतर लगेचच शरद पवार हे अहमदनगर व नाशिक दौऱ्यावर निघाले. आज शुक्रवारी ते अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून अकोलेत आहेत.

याठिकाणी भव्य शेतकरी मेळावा पार पडला असून निमित्त होते दिवंगत नेते अशोक भांगरे यांचा जयंती सोहळा. या मेळाव्यात शरद पवारांनी एल्गार करत विरोधकांवर चांगलीच तोफ डागली. यावेळी शरद पवार यांनी विविध प्रश्नांवरून विविध उदाहरणे देत पंतप्रधान मोदींसह विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

काय म्हणाले शरद पवार?
बळीराजासाठी सत्तेचा वापर करण्याचे सूत्र राज्यकर्त्यांचे असावे. देश आज एका वेगळ्या संकटातून जात आहे. शेतीला जोड म्हणून दुधाकडे पहिले जाते पण आज त्यासाठी लढण्याची, झगडण्याची वेळ आली आहे.

नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मागचा पुढचा विचार न करता कांद्याचे पीक घेत असतात. त्याला योग्य दर मिळणे गरजेचे आहे आणि इतकीच अपेक्षा शेतकऱ्यांचीही असते. परंतु तसे होताना दिसत नाही.

नाशिकमध्ये मोदींची सभा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने उठून जगाच्या गोष्टी सांगताय, माझ्या कांद्याला भाव द्या असा सवाल केला होता तर त्याला पोलिसांनी पकडून आत टाकले. याचा अर्थ या देशात मोदींच्या राज्यात आता कांद्याला भाव मागण्याचा अधिकार राहिला नाही

हेच नाशिक मधून समोर आले आहे. शेती आणी शेतकरी यांच्याबद्दल अजिबात आस्था या सरकारला नाही. लोकसभेत तुम्ही उत्तम साथ दिली आता विधानसभेलाही साथ द्याल असे पवार यांनी म्हटले.

विधानसभेची तुतारी फुंकली
या मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले, सत्तर दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपलीये. त्यामुळे आता सर्वांनी तयारीला लागा. तुम्ही सर्व एक असाल तर कुणीही आपल्याला धक्का लावू शकत नाही.

सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहत नाही. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, तुम्ही मला अनेकदा निवडून दिले आहे त्यामुळे आता आता काही मागायचं नाही असे मी ठरवले आहे. फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आलं पाहिजे एवढं लक्षात घ्या असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe