शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, ऐन निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांच्या मतदारसंघातील ‘हा’ बडा नेता भाजपामध्ये

गेल्या निवडणुकीत रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्राध्यापक राम शिंदे यांच्यात लढत झाली होती. गेल्या लढतीत रोहित पवारांनी येथून विजय मिळवला. मात्र यावेळी रामाभाऊंनी निवडणुकीआधीच जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे या मतदारसंघातून रोहित पवारांना एक मोठा झटका बसणार असे वृत्त समोर आले आहे. रोहित पवार यांचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात सामील होणार अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम पेटणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आणि महाविकास आघाडीने जोरदार कमबॅक करत लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. दरम्यान, आता हे दोन्ही गट विधानसभेच्या निवडणुकांसाठी पूर्वतयारी करत आहेत.

दोन्ही गटात जागावाटपावर चर्चा सुरू आहेत. बंद दाराआड जागा वाटपावर जोरदार खलबत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीने तिन्ही घटक पक्षांमध्ये जागावाटप करण्यासाठी सीटिंग गेटिंग हा फॉर्म्युला आणला आहे. म्हणजे ज्या पक्षाचे विद्यमान आमदार आहेत त्याच पक्षाला यंदाच्या निवडणुकीत सुद्धा तिकीट दिले जाणार आहे.

अशा सऱ्या घडामोडी घडत असताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस साठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ही चिंताजनक बातमी समोर आली आहे ती शरद पवार यांचे नातू म्हणजेच आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातून. खरे तर कर्जत जामखेडचा मतदार संघ हा एक हाय प्रोफाईल मतदार संघ आहे.

गेल्या निवडणुकीत रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्राध्यापक राम शिंदे यांच्यात लढत झाली होती. गेल्या लढतीत रोहित पवारांनी येथून विजय मिळवला. मात्र यावेळी रामाभाऊंनी निवडणुकीआधीच जोरदार तयारी सुरू केली आहे.

दुसरीकडे या मतदारसंघातून रोहित पवारांना एक मोठा झटका बसणार असे वृत्त समोर आले आहे. रोहित पवार यांचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात सामील होणार अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कर्जत जामखेड मतदारसंघातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि रोहित दादांचे विश्वासू कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत.

खरे तर गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या गटातील आणि भारतीय जनता पक्षातील अनेक कार्यकर्ते शरद पवार यांच्या गटात सामील होत होते. मात्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच शरद पवार यांच्या गटातील महत्त्वाचे म्हणजे रोहित पवार यांच्या मतदारसंघातील काही पदाधिकारी भारतीय जनता पक्षात सामील होणार आहेत.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मोठा झटका दिला असल्याच्या चर्चा आता नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत फडणवीस यांचे निकटवर्ती राम शिंदे यांचा पराभव झाला आणि याच पराभवाचा वचपा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना मोठा धक्का दिला आहे.

रोहित पवार यांचे काही निकटवर्तीय पदाधिकारी आता भारतीय जनता पक्ष सामील होण्याची शक्यता आहे. या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येथीलच तालुका अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांचा सुद्धा समावेश आहे हे विशेष. नक्कीच हा रोहित पवार यांच्यासाठी एक मोठा धक्का राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe