अजित पवारांचा ‘खास’, आमदारकीसाठी भाजपशी करतोय चर्चा, विखे कर्डिलेंचा पत्ता कट होईल? पहा..

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहेत. त्यादृष्टीने अनेक मतदारसंघात राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. या मतदारसंघात सर्वच पक्षांत जुन्या कार्यकर्त्यांचा मोठा भरणा असताना लोकसभा निवडणुकीनिमित्त अनेक नवीन कार्यकर्ते तयार झाले आहेत. निवडणूक आली की वेगवेगळे उद्देश समोर ठेऊन कार्यकर्त्यांची रेलचेल होते. काही एकनिष्ठ असतात, तर काही उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने फिरते असतात. परंतु आता महायुती व महाविकास आघाडी असल्याने अनेकांना इच्छा असली तरी शांतच बसावे लागणार असल्याचे चित्र आहे.

Pragati
Published:
kadam

विजय गोबरे/अहमदनगर
Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहेत. त्यादृष्टीने अनेक मतदारसंघात राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. या मतदारसंघात सर्वच पक्षांत जुन्या कार्यकर्त्यांचा मोठा भरणा असताना लोकसभा निवडणुकीनिमित्त अनेक नवीन कार्यकर्ते तयार झाले आहेत.

निवडणूक आली की वेगवेगळे उद्देश समोर ठेऊन कार्यकर्त्यांची रेलचेल होते. काही एकनिष्ठ असतात, तर काही उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने फिरते असतात. परंतु आता महायुती व महाविकास आघाडी असल्याने अनेकांना इच्छा असली तरी शांतच बसावे लागणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात एका नव्या चर्चेने जोर धरलाय. तो म्हणजे राहुरीमध्ये भाजपकडून माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे आग्रही असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चंद्रशेखर कदम हे मेहुणे आहेत.

कदम इच्छुक, भाजप वरिष्ठांच्या भेटी?
सध्याची बदललेली राजकीय गणिते पाहता सत्यजित कदम हे राहुरीतून विधानसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. सत्यजित कदम यांनी मुंबईत भाजप वरिष्ठांच्या भेटी
देखील घेतल्या असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान या भेटींबाबत कदम यांच्याकडून काही पुष्टी मिळाली नाही. असे असले तरी ते इच्छुक असल्याचे व त्या दृष्टीने हालचाल करत असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार महायुतीत असल्याने फडणवीस यांच्याकडे सत्यजित कदम यांच्यासाठी ते आग्रह धरू शकतात.

याचे कारण असे की ते या खेळीमधून जयंत पाटील यांचे भाचे असलेले विद्यमान आ.प्राजक्त तनपुरे यांना आव्हान येत एकप्रकारे शरद पवार गटाला शह देण्याची खेळी करू शकतात अशी चर्चा आहे.

विखे-कर्डिलेंचे काय?
दरम्यान राहुरीतून विखे कुटुंबियातील चेहरा भाजपकडून उभा राहू शकतो असे म्हटले जात आहे. तसेच आ. शिवाजी कर्डीले हे येथून मागील वेळी उभे येथे परंतु त्यांचा पराभव झाला होता.

परंतु यावेळी ते देखील राहुरीवर दावा करू शकतात. पण जर मधेच सत्यजित कदम यांची वर्णी लागली तर मात्र विखे-कर्डिलेंचे काय? त्यांचा राहुरीमधील रेस मधून पत्ता कट होईल का? असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe