Ahmednagar Politics : नेवाशात गडाखांना अलर्ट ! मुरकुटेही गॅसवर, विधानसभेला गणिते फिरण्याची शक्यता?

Pragati
Published:
gadakh

नुकताच लोकसभेचा निकाल लागला. यामध्ये मिळालेले एकंदरीत मते, मताधिक्य पाहता अनेक विद्यमान आमदारांची चिंता वाढली आहे. नगर, शिर्डी, माढा आणि सोलापूर या चार जागा विरोधकांनी खेचून भाजप महायुतीला मोठा धक्का दिला गेला आहे.

जिल्ह्याचा विचार केला तर विद्यमान आमदारांना स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारास आपल्या मतदार संघात मताधिक्य देता न आल्याने त्यांच्या विरोधात मतदारांनी कौल दिला असल्याची चर्चा आहे. आता आपण नेवासे मतदार संघाचा जर विचार केला तर दोन्ही आजी माजी आमदारांना यातून घेण्यासारखे बरेच काही आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाल्यानंतर आमदार शंकरराव गडाख गटाच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला, तर तालुक्यातून शिवसेना (शिंदे) गटाचे उमेदवार सदाशिव लोंखडे यांना तीन हजार १२८ मताचे लीड मिळाल्याने भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना देखील लढण्यासाठी बळ मिळाले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वाकचौरे विजयी झाल्यानंतर संपूर्ण नेवासे तालुक्यात आमदार गडाखांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. माजी आमदार मुरकुटे यांच्या कार्यकत्यांनी मात्र यावेळी शांत राहणे पसंत केले.

रात्री उशिरा तालुक्यातून लोखंडे यांना मताधिक्य मिळाल्याचे पुढे आल्यानंतर मुरकुटे गटाने सोशल मीडियावर पराभवातही लीड दिल्याचा आनंद साजरा केला. ‘ये तो सिर्फ झाँकी है, विधानसभा बाकी है…’ असा सूर व्यक्त करण्यात आला.

तालुक्यातील चौदा पंचायत समिती गणांपैकी घोडेगाव (८३), चांदे (१३०२) बेलपिंपळगाव (१८८०), सलाबतपूर (२१३), शिरसगाव (१९७३), मुकिंदपूर (९४) तसेच नेवासे नगरपंचायतीमध्ये लोंखडे यांना ११६६ मताचे मताधिक्य राहिले, तर सोनई (५८०) देडगाव (४५९), खरवंडी (८८८), करजगाव (५३९), भानसहिवरे (५७०), पाचेगाव (९०), कुकाणे (२१३), भेंडे (१०९), गणात वाकचौरे यांना मताधिक्य राहिले आहे.

दोन्ही गट कामाला
दरम्यान या मतांवरून विधानसभेची गणिते ठरवणे तसे तर किचकट असते. लोकसभेपेक्षा विधानसभेचे चित्र पूर्णतः वेगळे असते. या निकालावर विधानसभेचा अंदाज बांधणे चुकीचे आहे असे म्हटले जात आहे. दरम्यान हा निकाल मुरकुटे गटाला गुदगुल्या करणारा, तर गडाख गटाला सावधान करणारा ठरल्याने दोन्ही गट कामाला लागले असल्याची चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe