Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का ! आमदारकीला नरहरी झिरवाळ यांचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा, मोठा ट्विस्ट

Ahmednagarlive24 office
Published:
POLITICS

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकारणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. लोकसभेच्या निकालानंतर विविध घटनाक्रम येथे घडत आहे. अजित पवार गटात अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय.

अजित पवार गटात असणारे आमदार नरहरी झिरवाळ यांनी आता या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार संदीप गुळवे यांना पाठिंबा जाहीर केलाय. कार्यकर्त्यांना झिरवाळ यांनी त्यांचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता या नवडणुकीत मोठा ट्विस्ट आला असून हा उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

कौटुंबिक संबंधांमुळे जाहीर पाठींबा
संदीप गुळवे हे ठाकरे गटाचे उमेदवार असून स्वतः नरहरी झिरवाळ यांनीच त्यांना जाहीर पाठींबा असल्याची घोषणा केलीये. कौटुंबिक संबंधांमुळे हा पाठिंबा दिला असल्याने त्यांनी सांगितलेय. संदीप गुळवे झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भेटायला आले असता त्याचवेळी झिरवाळ यांनी गुळवेंना जाहीर पाठिंब्याची घोषणा केली.

महायुतीकडून किशोर दराडे
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेतर्फे किशोर दराडे हे उभे राहिलेले असून गुळवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर भाजपच्या माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजिव विवेक कोल्हे देखील अपक्ष उमेदवारी करत आहेत. दरम्यान असे असले तरी शिक्षक मतदारसंघात पक्षीय गणित बाजूला ठेवून गुळवे यांना पाठिंबा दिला असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

अजित पवार गटात नाराजी सत्र?
अजित पवार गटातील अनेक नेते नाराज आहेत अशा चर्चा होत आहेत. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आता आमदार नरहरी झिरवाळ यांनी देखील विरोधी उमेदवारास पाठिंबा दिल्याने ते ही नाराज आहेत का? अशा चर्चा सुरु झाल्यात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe