श्रीगोंदा तालुक्यात लॉन्च झाली Toyota ची सर्वात स्वस्त कार ! आता मिळणार तालुक्यातच टोयोटाच्या सर्व कार

वासन टोयोटा शोरुमच्या श्रीगोंदा शाखेचे उद्घाटन ! ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरचे अनावरण

Ahmednagarlive24
Published:

ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी वासन टोयोटा शोरुमच्या श्रीगोंदा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. आढळगाव रोड येथे नव्याने झाल्या या शोरुममध्ये सर्वांना परवडेल अशा किंमतीत लॉन्च करण्यात आलेल्या एसयुव्ही श्रेणीतील ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरचे अनावरण करण्यात आले.

यावेळी श्रीगोंदा नगर पालिकेचे अध्यक्ष मनोहरदादा पोटे, नगरसेवक नानाभाऊ लोखंडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन नाना डांगरे, पारगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजी जगताप,

प्राध्यापक डी.एम. शिंदे, काष्टी सेवा सोसायटीचे चेअरमन कैलास तात्या पाचपुते, विश्‍वास भुजबळ, वासन टोयोटाचे जनक आहुजा, अनिश आहुजा, प्रविण जोशी, समीर पवार, सूर्यकांत खेतमाळीस, मयूर गुंजाळ आदींसह ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोहरदादा पोटे म्हणाले की, शेतकरी वर्ग व ग्रामीण भागाचा विचार करुन किर्लोस्कर कंपनी वाहन उत्पादन करत आहे. सुरक्षितता, दणकटपणा व आकर्षक लुक मधील टोयोटाचे वाहन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. विक्री पश्‍चातही वासन टोयोटाच्या माध्यमातून उत्तम सेवा मिळत असून, मोठा ग्राहक वर्ग त्यांच्याशी जोडला गेला आहे.

श्रीगोंदा येथे झालेल्या नवीन शोरुमच्या माध्यमातून सर्व सुविधा तालुकास्तरावर उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकांना वारंवार नगर शहरात जाण्याची गरज भासणार नाही. तालुक्याची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या सेवेचा सर्वांना लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जनक आहुजा यांनी श्रीगोंदा तालुक्याचा शेतकरी वर्ग वासन टोयोटाशी जोडला गेलेला आहे. अनेकांकडे टोयोटाचे विविध वाहन असून, त्यांना शोरुमच्या सर्व सुविधा स्थानिक ठिकाणी मिळणार आहे. ग्राहक वर्गाचा विचार करुन नवीन शोरुम सुरु करण्यात आले असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन वासन टोयोटाच्या वतीने त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe