मंत्री विखेंच्याच मतदारसंघावरून भाजपात घमासान, यंदा तिकीट मिळेल की दुसऱ्याला संधी? पहा..

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदार संघात फेरबदल पाहायला मिळतील. अनेकांची तिकिटे कापली जातील तर नवख्यांना संधी मिळेल.

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदार संघात फेरबदल पाहायला मिळतील. अनेकांची तिकिटे कापली जातील तर नवख्यांना संधी मिळेल.

परंतु आता हा वाद किंवा भाजपांतर्गत कलह थेट मंत्री विखेंच्याच मतदार संघापर्यंत जाऊन पोहोचलाय. येथे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जाणारे राजेंद्र पिपाडा यांनी विखेंच्या विरोधात दंड थोपटलेत.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांमुळे अहमदनगर जिल्ह्यात भाजपची अधोगती झाल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय. तसेच या मतदार संघातून विधानसभेसाठी आपलाच हक्क देखील त्यांनी सांगितलाय.

आता भाजप विखे विरोधात असताना धुरा सांभाळणाऱ्या पिपाडा यांना तिकीट देणार की, पिपाडा यांना डावलून विखेंनाच तिकीट देणार हे पाहणे गरजेचे ठरेल.

नेमके काय म्हटलेत पिपाडा?
विखे पाटील हे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच ते पुढे म्हणाले, या विंचवाला जर मारलं तर ती चप्पल महादेवाला लागते अन अशाच पद्धतीची स्थिती भाजप नेत्यांची झाली आहे असा घणाघात पिपाडा यांनी केलाय.

राजेंद्र पिपाडा ऍक्शन मोडवर
शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र या मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते व कट्टर फडणवीस समर्थक राजेंद्र पिपाडा यांचे विखेंशी पटत नाही.

२००९ साली विखे काँग्रेसमध्ये असताना पिपाडा यांनी भाजपकडून उमेदवारी करत विखेंना घाम फोडला होता. विखे भाजपमध्ये आल्यानंतरही या दोघांची मनं जुळलेली नाहीत.

त्यामुळे यंदा विखेंविरोधात पुन्हा निवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून त्यांनी चाचपणी सुरु केल्याचेही दिसत आहे.

त्यामुळे आता पिपाडा यांचे मन सांभाळणे भाजपसाठी फार गरजेचे झाले आहे. त्यामुळे यंदा शिर्डीत भाजप काय करणार? विखेंना तिकीट देणार की पिपाडा यांना तिकीट देणार? हे पाहणे गरजेचे ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe