भाजपच्या प्लॅनिंगमुळे संग्राम जगतापांच टेन्शन वाढल; BJP ने राष्ट्रवादीला (अजित पवार गट) डिवचलं ; मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी नवा डाव टाकला !

नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महाविकास आघाडी कडून तयारी सुरू झाली आहे. मात्र या दोन्ही गटांकडून अजून अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. तथापि, महायुतीने ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाला ती जागा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. येथून अजित पवार गटाचे संग्राम भैया जगताप हे विद्यमान आमदार आहेत.

Published on -

Ahmednagar Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होणार असून त्या आधीच निवडणूक घेतली जाणार आहे. अर्थातच येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महाविकास आघाडी कडून तयारी सुरू झाली आहे. मात्र या दोन्ही गटांकडून अजून अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. तथापि, महायुतीने ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाला ती जागा देण्याचा निर्णय घेतलाय.

त्यानुसार नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. येथून अजित पवार गटाचे संग्राम भैया जगताप हे विद्यमान आमदार आहेत. म्हणून यंदाच्या निवडणुकीत ही जागा अजित पवार गटाला सुटू शकते आणि इथून पुन्हा एकदा संग्राम भैया आपले नशीब आजमावतांना दिसतील असे वाटते.

मात्र अशा या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाने नगर शहर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी आपल्या पारड्यात आणण्यासाठी प्लॅनिंग सुरू केलंय. भारतीय जनता पक्षाने या जागेवर आपला भिडू उतरवण्यासाठी जो प्लॅन वापरला आहे त्या प्लॅनची सध्या संपूर्ण नगर मध्ये चर्चा आहे. मात्र बीजेपीची ही प्लॅनिंग संग्राम भैय्या जगताप यांच्या खेम्यात अस्वस्थता पसरवत आहे.

बीजेपीच्या प्लॅनिंगची जोरदार चर्चा

नगर शहर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी भाजपामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपाचे पक्ष निरीक्षक महेश हिरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्ष नगर शहर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक संपन्न झाली आहे.

या बैठकीत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, राजेंद्र काळे, मुकुंद देवगावकर, सचिन पारखी व ज्योती दांडगे आदींनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले.

दरम्यान यातील तीन जणांना या बैठकीसाठी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पसंतीक्रमाने मतदान केले. यावेळी 266 हुन अधिक पदाधिकारी उपस्थित होते मात्र प्रत्यक्षात 100 हून अधिक लोकांनी मतदानात भाग घेतला. आता या पदाधिकाऱ्यांनी सुचवलेले इच्छुक उमेदवारांचे नाव पाकीटात बंद झाले असून हे बंद पाकीट आता पक्ष निरीक्षक महेश हिरे प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करणार आहेत.

यावेळी हिरे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात इच्छुक उमेदवारांची नावे, पदाधिकारांच्या मनातील उमेदवारांची नावे जाणून घेण्यासाठी ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात असल्याचे म्हटले.

तसेच, हिरे यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाला सुटावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे आपण मागणी करणार असल्याचेही सुतोवाच केले. भाजपाचा हा नवा डाव मात्र अजित पवार गटाचे टेन्शन वाढवत आहे. भाजपाच्या या प्लॅनिंगमुळे संग्राम भैया जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता जाणवत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe