Ahmednagar Politics : श्रीरामपुरात प्रचार लोकसभेचा, मात्र रंगीत तालीम केली विधानसभेची, आमदारकीसाठी इच्छुक दिग्गजांच्या भाऊगर्दीत आखाडा तापणार

Pragati
Published:
murkute

Ahmednagar Politics : शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक नुकतीच सम्पन्न झाली. दक्षिणेऐवढी जरी ही निवडणूक गाजली नसली तरी या निवडणुकीतील अनेक गणिते दक्षिणेतील विधानसभेची गणिते बदलवतील असे चित्र आहे.

याचे कारण असे की, लोकसभेच्या प्रचारादरम्यान श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारसंघ पिंजून काढीत लोकसभेच्या आखाड्यात विधानसभेच्या कुस्तीची रंगीत तालीम केली आहे. खासदार लोखंडे यांच्या पाठीशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, बांधकाम मंत्री दादा भुसे,

माजी आमदार भानुदास मुरकुटे व राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे या सर्वच प्रमुख नेत्यांची टीम होती. तर महविकास आघाडीचे वाकचौरे यांच्या पाठीशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, माजी उपनगरध्यक्ष करण ससाणे आदी नेत्यांची टीम होती.

श्रीरामपुरात संभाव्य उमेदवार
श्रीरामपुर विधानसभा मतदार संघातून इच्छुक असणाऱ्या संभाव्य उमेदवार आहेत. त्यांनी आपली रंगीत तालीम करून घेतली. निवडणुकीपूर्वी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे ठाकरे शिवसेनेत होते. महविकास आघाडीमध्ये काँग्रेस पण आहे आणि श्रीरामपुरात काँग्रेसचे लहू कानडे आमदार आहेत.

त्यांनाच परत उमेदवारी मिळेल, असा सल्ला त्यांना त्यांच्या राजकीय सल्लागारांनी दिल्याने त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या सेनेत प्रवेश करून विधानसभा उमेदवारीचा शब्द घेतला. मात्र, निकाल नेमका उलटा आलेला आहे. काँग्रेसमधून लहू कानडे हे विद्यमान आमदार आहे. विद्यमान आमदाराला उमेदवारी मिळेल, अशी त्यांना खात्री आहे. मात्र, काँग्रेसमधील ससाणे गटाकडून हेमंत ओगले हेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या विजयाने महाविकास आघाडीच्या संभाव्य इच्छुक उमेदवारांच्या इच्छा आंखणीच प्रबळ झाल्या आहेत. त्यामुळे आतापासूनच उमेदवारी बाबत रस्सीखेच सुरू झाली.

दरम्यान, सध्या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, हेमंत ओगले यांनी लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मतदार संघ पिंजून काढला. मतदारांशी संवाद साधत विधानसभेच्या प्राथमिक प्रचार फेरीची फेरीची साखर पेरणी केली. विधानसभेची तयारी यातून सुरू केली.

महायुतीकडूनही अनेक दिग्गज इच्छुक
महायुतीकडून देखील अनेक दिग्गज इच्छुक आहेत. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट आदी पक्षांतील अनेक दिग्गज विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात येथे विधानसभेसाठी मोठी रस्सी खेच होताना दिसेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe