चिमुरड्याच भाषण अन अहमदनगरधील 35 वर्ष सत्तेत असणारा आमदार पडला

नगरचं राजकारण जरा बेरकीच ! येथे कधी काय घडेल हे सांगता येणे कठीण. येथील जनता एखाद्यास डोक्यावर चढवते तशी खाली देखील घेते. असे अनेक प्रकार अहमदनगरकरांनी अनुभवले आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
politics

Ahmednagar Politics : नगरचं राजकारण जरा बेरकीच ! येथे कधी काय घडेल हे सांगता येणे कठीण. येथील जनता एखाद्यास डोक्यावर चढवते तशी खाली देखील घेते. असे अनेक प्रकार अहमदनगरकरांनी अनुभवले आहेत.

आता एका चिमुरड्याच एक वक्तव्य चर्चेचा विषय झाला आहे. या चिमुरड्याने असं म्हटलंय की ‘मी एक भाषण केलं अन त्यामुळे 35 वर्ष सत्तेत असलेला आमदाराचा पराभव झाला..’. हा चिमुरडा म्हणजे छोटा पुढारी घनश्याम दरवडे.

घनश्याम दरवडे सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या सेटवर दिसतोय. पाचव्या भागाला सुरवात झाल्यानंतर काही किस्से समोर येऊ लागले आहेत. यामध्ये छोटा पुढारी घनश्याम दरवडे याने देखील अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्याने या सेटवर एक दावा केला आहे. ‘मी एक भाषण केलं अन त्यामुळे 35 वर्ष सत्तेत असलेला आमदाराचा पराभव झाला..’. सध्या त्याच्या याच दाव्याची सध्या चर्चा होत आहे.

बिग बॉसच्या इतर कँडिडेटसोबत बोलताना छोटा पुढारी याने हा दावा केला असून तो पुढे म्हणालाय की, मी जनतेचा पुढारी आहे. माझ्यामुळे आमच्याच तालुक्यातला एक आमदार पराभूत झालेला असून त्यावेळी मी एक भाषण केले होते.

ते केलेले भाषण लोकांना इतके आवडले की, मीडियाने नंतर ते उचलून धरल्याने ते खूप व्हायरल झाले. त्यामुळे 35 वर्ष सत्तेत असलेल्या आमदाराला चिमुकल्याने पडल्याचा दावा छोटा पुढारीने केलाय. दरम्यान त्याने हा दावा केल्यानंतर अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी त्यास विचारलं की, याने साध्य काय झाले?

यावर तो म्हणतो की, ‘माझ्या गावचा रोड उत्तम झाला असून त्यानंतर माझ्या गावात पाणी आले. माझ्या गावापर्यंत बस देखील आली. दरम्यान त्याच्या या दाव्यानंतर मोठ्या चर्चाना सुरवात झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe