Ahmednagar Politics : आ. संग्राम जगतापांविरोधात शहर भाजपची उघड भूमिका, तर ‘मविआ’त शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसही तिकिटासाठी आग्रही

Pragati
Published:
agarakar

Ahmednagar Politics :  लोकसभेच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीत नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी विधानसभेसाठी तयारी झाली आहे. तसेच शहरात भाजपला मिळालेले मताधिक्याने त्यांच्यातही आमदारकीसाठी चर्चा सुरु झाली आहे.

आ. संग्राम जगतापांविरोधात शहर भाजपची उघड भूमिका
भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस हे महायुतीतील घटक पक्ष आहेत. परंतु सध्या त्यांच्यात बिनसले असल्याचे चित्र आहे. याचे कारण असे की आ. संग्राम जगतापांविरोधात शहर भाजपने उघड भूमिका घेतल्याचे दिसते.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी आगामी विधानसभेला नगर शहर मधून  पंकजा मुंडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. हा आमदार संग्राम जगताप यांच्या आगामी उमेदवारीला उघडपणे विरोध मानला जात आहे.

‘मविआ’त सर्वच आग्रही
खासदार नीलेश लंके यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेसच्या नेत्यांकडून विधानसभेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर, शिवसेना ठाकरे गटाचे विक्रेम राठोड, काँग्रेसचे किरण काळे यांमध्ये आता आमदारकीची रस्सीखेच दिसून येईल अशी चर्चा काही लोक करतायेत.

भाजपकडून कोण इच्छुक ?
पंकजा मुंडे यांचे नाव आगामी विधासभेसाठी सुचवून भाजपने शहरातून ओबीसी उमेदवाराला तिकिटासाठी रणनीती आखली आहे अशी चर्चा आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना शहरातून मताधिक्य असल्याने भाजपला विजयाची खात्री आहे.

त्याचप्रमाणे भाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे हे देखील आमदारकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचाही दावा
नगर शहरातील मतदारांनी कायम शिवसेनेला साथ दिली आहे. नगर शहर मतदारसंघ स्व. अनिल भैय्या राठोड यांच्या विचारांना साथ देणारा आहे. नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने लंके यांच्या पाठीशी ताकद उभी केली व यातून विखेंचे मताधिक्य घटले. त्यामुळे नगर विधानसभेच्या जागेवर पहिला दावा आमचाच आहे व शिवसेनेला टाळता येणार नाही, असे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe