Ahmednagar News : केडगावमध्ये कोतकरांची साथ असूनही सुजय दादांचे मताधिक्य कितीने घटले? कोतकर समर्थकांचीही आगामी काळातील चिंता वाढली, पहा..

Pragati
Published:
kotkar

Ahmednagar News : दक्षिणेत सुजय विखे यांना लोकसभेला केडगाव उपनगरात कोतकर व समर्थकांनी पुरेपूर साथ दिली. कोतकरांचा बालेकिल्ला असणाऱ्या केडगावात विखे यांचा गड राखण्यासाठी कोतकर समर्थकांनी पुरेपूर प्रयत्न केले. परंतु मागीलवेळी पेक्षा यावेळी मताधिक्य घटले. कोतकर यांनी संपूर्ण प्रयत्न केले, केडगावमधून ३ हजार ५५८ मतांचे मताधिक्य देखील दिले.

परंतु मागील वेळी ते आठ हजारांपर्यंत होते. विखे यांचे निम्म्याने मताधिक्य केडगावात घटलेले दिसले. दरम्यान आता हे घटलेले मताधिक्य कोतकर समर्थकांना चिंता करायला लावणारे आहे.

केडगाव हा माजी महापौर संदीप कोतकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. मागील वेळी त्यांची केडगावमध्ये गैरहजेरी असूनही शिवसेनेच्या जोरावर विखे यांनी आठ हजार मतांची आघाडी घेतली होती. विरोधात संग्राम जगताप उमेदवार असूनही केडगावमधील हे मताधिक्य विखे यांच्यासाठी फायद्याचे ठरले होते.

मात्र, पाच वर्षांनंतर यावेळी केडगावमधील राजकीय परिस्थिती बदलली. कोतकर गटाने विखे यांच्या मागे ताकद उभी करून केडगावमध्ये मोठ्या मताधिक्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. सभा, प्रचार फेऱ्या, मतदार गाठीभेटीच्या माध्यमातून विखे यांना कोतकर समर्थकांनी मोठी साथ दिली. केडगावच्या विकासाचा मुद्दा पुढे करून विखे यांच्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करण्यात आली.

विखे यांना केडगावमधील २४ मतदान केंद्रांत १० हजार ५३५ मते मिळाली, तर विजयी नीलेश लंके यांना ६ हजार ९७७ मते मिळाली. विखे यांना केडगावमधून ३ हजार ५५८ मतांची आघाडी मिळाली. मागील वेळी ती आठ हजार म्हणजे दुप्पट होती. त्यामुळे विखे यांचे मताधिक्य घटविण्यात विरोधक बऱ्यापैकी यशस्वी झाले.

६० टक्के मतदारांनी दाखवला विश्वास
कोतकर गटाने यावेळी केडगाव विकासाचा मुद्दा उपस्थित केला होता. मूलभूत विकासकामे, पाणी योजना, रस्ते यासारखे मुद्दे मतदारांपर्यंत नेले. जवळपास ६० टक्के मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला. दरम्यान कोतकर यांची साथ असूनही केडगावमध्ये मतदान घटते हे कोतकर समर्थकांचनही चिंता वाढवणारे कारण भविष्याच्या दृष्टीने बनू शकते अशी चर्चा आहे.

कर्डिले, कोतकर, जगतापांना सोबत घेतल्याने विखेंचा पराभव ?
गाडे गतवेळी विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात निवडणूक लढविली. दिवंगत अनिल राठोड यांनी विखे यांच्यासाठी प्रचार केला. मात्र त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विखेंनी विरोधात काम केले.

यावेळी त्यांनी शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप आणि कोतकर यांना सोबत घेतले. त्यामुळे त्यांना शहरातून गतवेळीपेक्षा यावेळी २० हजार मते कमी मिळाली, अशी टीका शशिकांत गाडे यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe