Ahmednagar Politics : सुजय विखेंची व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागणीवर खा. लंके यांची ‘खास’ प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांचा इतिहासच…

Ahmednagarlive24 office
Published:
lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज केला आहे. 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी अशी मागणी केलीये. यावर आता खासदार निलेश लंके यांनी खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिलीये.

काय म्हणाले लंके?
निलेश लंके यांनी असे म्हटले आहे की, सुजय विखे यांना पराभव मान्य होत नाहीये त्यांनी आता आपला पराभव स्विकारला पाहिजे. पुढे बोलताना लंके म्हणाले, विखे कुटुंबाला तसा इतिहासच असून अगदी यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबियांकडून अशाच पद्धतीने वागण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित केली म्हणजे विखेंनी केंद्रीय यंत्रांवरच आक्षेप घेतलाय असेही लंके म्हणाले.

काय आहे प्रकरण?
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज केला आहे. केवळ ४० मतदान यंत्रांची पडताळणी निवडणूक आयोगाच्या सवलतीमुळे मिळणार आहे.

त्यानुसार डॉ. विखे यांनी अर्ज दाखल केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका मतदान यंत्राच्या पडताळणीसाठी ४० हजार रुपये जमा करावी लागते. सुजय विखे यांनी ४० मतदान यंत्रांच्या पडताळणीसाठी प्रत्येकी ४७ हजार २०० रुपये जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केले आहेत. लोकसभेची मतमोजणी ४ जून रोजी झाली.

तत्पूर्वी १ जूनला निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नवीन आदेश जारी केला. त्यानुसार क्रमांक २ व क्रमांक ३ ची मते मिळालेल्या पराभूत उमेदवारांना एकूण ५ टक्के मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट पडताळण्याची सवलत दिली आहे. मात्र त्यासाठी मतमोजणी झाल्यानंतर ७ दिवसात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार डॉ. विखे यांनी या सवलतीचा लाभघेत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.

अहमदनगर मतदारसंघात २०२६ मतदान केंद्र होती. त्यापैकी नगर शहर ५, शेवगाव-पाथर्डीतील ५, राहुरीतील ५, कर्जत-जामखेडमधील ५, पारनेरमधील १० व श्रीगोंद्यातील १० अशा एकूण ४० मतदान यंत्रे व व्हिव्हिपॅट पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे. विखे यांना ज्या विधानसभे मतदारसंघात कमी मते मिळाली. तेथील अधिक संख्येने तर ज्या विधानसभेत मताधिक्य मिळाले तेथील कमी मतदान यंत्रांच्या पडताळणीची मागणी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe