Ahmednagar Politics : विधानसभेसाठी ‘या’ सर्व मातब्बरांची फिल्डिंग ! शेवगाव-पाथर्डीसह श्रीगोंदेमध्येही बहुरंगी लढतीची चिन्हे

Published on -

Ahmednagar Politics : आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेल्या आहेत. लोकसभेला आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेकांनी आमदारकीचा शब्द दिला. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातील काही मतदार संघात अनेक इच्छुक निर्माण झालेत.

त्यामुळे काही मतदार संघात बहुरंगी लढती होतील असे चित्र निर्माण होताना दिसतेय. यामध्ये प्रामुख्याने शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदे हे मतदार संघ आघाडीवर दिसतील. येथे आमदारकीच्या इच्छुकांची भाऊ गर्दी झालेली आहे. आपण जर शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचा विचार जर केला तर आगामी निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून अनेक इच्छुक पुढे येतील असे चित्र आहे.

या मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे या दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या प्रताप ढाकणे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले हेही तयारी करत आहेत. राजळे, घुले, ढाकणे असा तिरंगी सामना निश्चित असला, तरीही या तिघांशिवाय शेवगाव तालुक्यातून जनशक्ती विचारमंचाचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे किंवा त्यांच्या पत्नी हर्षदा काकडे,

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, वंचित आघाडीकडून प्रा. किसन चव्हाण हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात असा अंदाज नागरिक बांधत आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

आता श्रीगोंदे मतदार संघाचा विचार जर केला तर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात बबनराव पाचपुते हे भाजपचे आमदार आहेत. मागील वेळी राहुल जगताप निवडणुकीपासून दूर राहिले. मात्र, त्यांनी कुकडी साखर कारखाना, जिल्हा बैंक, श्रीगोंदा बाजार समिती व खरेदी- विक्री संघात बाजी मारत पायाभरणी केली. राजेंद्र नागवडे यांनी नागवडे साखर कारखान्याच्या माध्यमातून आपली पकड कायम ठेवली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे अजित पवार गटात दाखल झाले आहेत. घनश्याम शेलार हे काँग्रेसमध्ये दाखल झालेत. बाबासाहेब भोस यांनी नागवडेंना सोडून शरद पवारांची साथ धरली आहे.

तर साजन पाचपुते काका बबनराव पाचपुते यांना सोडून शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता येथेही पाचपुते-नागवडे-जगताप-शेलार-भोस-साजन पाचपुते अशी इच्छुकांची मांदियाळी निर्माण झाली आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या असलेली महाविकास आघाडी व महायुती यांनी जर स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला, तर प्रत्येक इच्छुकांना एखाद्या तरी पक्षाची उमेदवारी मिळू शकते पण जर एकला चलो रे ची भूमिका घेत सुद्धा निवडणूक लढवण्याची शक्यता गृहीत धरून या वेळेसची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe