Ahmednagar Politics : विधानसभेसाठी महाविकास आघाडीत ‘हलचल’, कळमकर-काळे-राठोड यांमध्येच रस्सीखेच?

Pragati
Published:
rathod

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची लक्षवेधी ठरलेली निवडणूक आता संपली असून निलेश लंके यांच्या रूपाने भाजपच्या सत्तेला छेद गेला आहे. महाविकास आघाडीची ताकद आता नगर शहरासह जिल्ह्यात वाढली आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधातही मोठी ताकद उभी राहील असे चित्र आहे.

भाजप अर्थात महायुतीचा जो जिल्ह्यात पराभव झाला आहे विशेषतः दक्षिणेत त्यामुळे या पराभवाचे मोठे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवर उमटतील हे निश्चित. विधानसभेतील राजकिय गणिते महाविकास आघाडी भोवती पर्यायाने काँग्रेसचे जेष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्याभोवती फिरतील असे म्हटले जात आहे.

त्याचमुळे आता विधानसभेसाठी जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील अनेक इच्छुक राजकीय दिग्गजांमध्ये आमदारकीच्या उमेदवारीसाठी ‘हलचल’ सुरु झाली अशी चर्चा आहे. शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर, शिवसेना ठाकरे गटाचे विक्रेम राठोड, काँग्रेसचे किरण काळे यांमध्ये आता आमदारकीची रस्सीखेच दिसून येईल अशी चर्चा काही लोक करतायेत.

किरण काळे :
निलेश लंके यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारे जे फ्लेक्स काँग्रेसने लावले आहेत त्यावर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे भावी आमदार म्हणून उल्लेख केला असल्याचे दिसते. तर राष्ट्रवादीने आता लोकसभेच्या मदतीची विधानसभेला परतफेड करावी असे म्हणत काळेंच्या उमेदवारीसाठी काँग्रेस श्रेष्ठींकडे शहर काँग्रेस दावा करणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटलेय.

अभिषेक कळमकर :
माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे पोस्टर लागले होते त्यावर देखील नगर शहराचे भावी आमदार असा उल्लेख होता.

ते सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्ह्याध्यक्ष देखील आहेत. दरम्यान या फलकाबाबत विचारणा झाली तेव्हा त्यांनी हे फलक समर्थक कार्यकर्त्यांनी लावले असल्याचे सांगत निवडणूक लढवण्याबाबत अद्याप कसलाही निर्णय नसल्याचे त्यावेळी सांगितले होते.

विक्रम राठोड :
नगर शहरात दिवंगत स्व.अनिलभैय्या राठोड यांनी शिवसेना रुजवली, वाढवली. 2019 मध्ये त्यांचा पराभव झालेला असला तरी अनिलभैय्यांच्या नावाची जादू आजही जनमानसाच्या मनावर आहे. त्यांचे चिरंजीव
विक्रम राठोड यांनी अनिलभैय्यांचा वारसा पुढे सुरू ठेवत

शिवसेनेची ताकत शहरात कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ते सध्या युवासेनेचे राज्य सहसचिव आहेत. साहजिकच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दावा ते करतील अशी चर्चा देखील आहे.

जागा कुणाला सुटणार ?
मविआ मधून आता नगर शहराची जागा कोणत्या पक्षाला दिली जाईल हे देखील पाहावे लागणार आहे. तसेच त्यानंतर उमेदवारी कुणाला द्यायची याबाबतही रस्सीखेच होताना दिसेल यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe