Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक महाराष्ट्रभर गाजली. यामध्ये सुजय विखे यांचा पराभव झाला तर निलेश लंके हे विजयी होत खासदार झाले. दरम्यान आता अहमदनगर लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याचे कारण म्हणजे सुजय विखे पाटील यांनी करायला लावलेली ४० मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी.
येथील आकडेवारी पाहता येथे निलेश लंके यांना या केंद्रावर २२,११२ मते आहेत तर विखे यांना ५,६५० मते आहेत. म्हणजेच त्यांनी आक्षेप घेतलेल्या या मतदान केंद्रावर नीलेश लंके यांना एकूण १६,४६२ मतांची आघाडी मिळाली आहे.

कोणत्या केंद्रांवर आक्षेप?
राहुरी विधानसभा मतदारसंघातील ५, नगर शहर ५, शेवगाव-पाथर्डी ५, कर्जत- जामखेड ५, पारनेर १०, श्रीगोंदा १०
बूथ गाव लंके विखे
८९ भिंगार ८४२ २४
९० भिंगार ९२३ ११
९८ भिंगार ६१० ४५
१८६ माळीवाडा ५९० ४५
१८२ माळीवाडा ३५३ ३९
पाथर्डी-शेवगाव
बूथ गाव लंके विखे
१४५ वाघोली ५१५ १४९
७७ शेवगाव ५३६ २७
१४ शहर टाकळी ५१४ २०५
३११ ढमाळवाडी ३०९ २६
८९ शेवगाव ५२२ २३९
राहुरी
बूथ गाव लंके
११० बारागाव नांदूर ५२३
६४ राहुरी बु. ४९३
६२ राहुरी बु. ५३८
२८७ सावतानगर ५६१
२१३ जेऊर ४४४
पारनेर
बूथ गाव लंके विखे
२४६ मोरवाडी ६९५ ७४
२६३ हंगा ७६४ १७३
२६४ हंगा ५८१ १४६
२४१ शिरापूर ५३५ १०१
२३७ म्हस्केवाडी ५१५ १०४
१६७ रांधे ५६२ १२०
६९ नांदूर पठार ५५९ ७५
६८ नांदूर पठार ५४६ ५०
३०१ सांगवी सूर्य ७२७ २३५
२२५ शेरी कोलदरा ६५५ १३८
कर्जत-जामखेड
बूथ गाव लंके विखे
९५ जामखेड ५६७ २०६
११२ जामखेड ६५३ ११३
११४ दूरगाव ५५८ १४८
२६४ बारडगाव दगडी ६५६ २३६
श्रीगोंदा
बूथ गाव लंके विखे
३१६ ढाकळी कडेवळीत ६४८ २३८
३१३ हिरडगाव ६१४ २०७
१५६ एरंडोली ५४५ १४५
२१८ बोरी ५८६ १८१
२३० बेलवंडी कोठार २९२ १९१
९३ ढवळगाव ५१८ २६७
१९१ वडाळी ४१९ १५५
३२६ चिखलठाणवाडी ५०९ २००
२०४ बेलवंडी स्टेशन ५९० २८२
१४१ पिंपळगाव पिसा ५१६ २०९