Ahmednagar Politics : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. विशेषतः निवडणुकांच्या कालावधीत या सोशल मीडियाचे महत्व अनेकांच्या लक्षात येते. त्यामुळे अनेक राजकीय नेते आता आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून असतात.
सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा राजकीय नेते करताना दिसून आले आहे. स्थानिक स्तरावरील लोकप्रतिनिधी असो की आमदार, खासदार सर्वच जण सोशल मीडियाशी कनेक्ट राहून नागरिकांशी संवाद साधत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील नेते मंडळी देखील यात पुढे आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात अकरा विधानसभा आणि दोन विधान परिषद असे १३ आमदार आहेत. हे तेराही आमदार आपापल्या पद्धतीने सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. यात आ. रोहित पवार हे अग्रेसर दिसून येतात. त्यांना सर्वाधिक १८ लाख ७६ हजार सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत.
आ. संग्राम जगताप, आ. सत्यजित तांबे हे देखील यात पुढे आहेत. सर्वात कमी फॉलोअर्स काँग्रेस आमदार लहू कानडे यांचे आहेत. एकंदरीत जर हे फॉलोअर्स पहिले तर सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये रोहित पवार, सत्यजित तांबे यांच्यानंतर काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कुणाचे किती फॉलोअर्स आहेत ते आपण पाहुयात –
रोहित पवार
फेसबुक – ५ लाख ४१ हजार
इन्स्टाग्राम – ५ लाख ९७ हजार
एक्स ७ लाख ३८ हजार
राधाकृष्ण विखे-पाटील
फेसबुक – ५९ हजार
इन्स्टाग्राम २३ हजार ९००
एक्स – ९० हजार
बाळासाहेब थोरात
फेसबुक – ३ लाख १२ हजार
इन्स्टाग्राम १ लाख ६९ हजार
एक्स २ लाख ८५ हजार
शंकरराव गडाख
फेसबुक – ७७ हजार
इन्स्टाग्राम ३० हजार १००
एक्स – १६ हजार
संग्राम जगताप
फेसबुक – ६५ हजार
इन्स्टाग्राम – १ लाख ३ हजार
एक्स २३ हजार ५००
सत्यजित तांबे
फेसबुक – ३ लाख १२ हजार
इन्स्टाग्राम ५ लाख ६३ हजार
एक्स १ लाख ६६ हजार
प्राजक्त तनपुरे
फेसबुक – ३४ हजार
इन्स्टाग्राम ३१ हजार ५००
एक्स ५४ हजार
आशुतोष काळे
फेसबुक – ६९ हजार
इन्स्टाग्राम ५० हजार १००
एक्स ११ हजार ५००
लहू कानडे
फेसबुक – ५ हजार ५००
इन्स्टाग्राम १ हजार
३७१ एक्स – ४५५
राम शिंदे
फेसबुक – १ लाख ६५ हजार
इन्स्टाग्राम २२ हजार ६००
एक्स २१ हजार १००
बबनराव पाचपुते
फेसबुक – ३४ हजार
इन्स्टाग्राम ३ हजार ५३
एक्स – २ हजार ५९५
मोनिका राजळे
फेसबुक – ७८ हजार
इन्स्टाग्राम २२ हजार ७००
एक्स ३ हजार ४९७
किरण लहामटे
फेसबुक – ३७ हजार
इन्स्टाग्राम २ हजार ९८५
एक्स – १००