खा. लंकेंचा स्वॅगच वेगळा ! खासदारकीची इंग्रजीत घेतली शपथ, मात्र शेवट केला राम कृष्ण हरी म्हणत..

आजपासून (२५ जून) संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. आज संसदेत नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. दरम्यान यात एक चर्चेचा विषय झाला तो म्हणजे नवनिर्वाचित खा. निलेश लंके यांनी घेतलेली शपथ. याचे कारण असे की त्यांनी ही शपथ इंग्रजीतून घेतली.

Pragati
Published:
lanke

Ahmednagar Politics : आजपासून (२५ जून) संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. आज संसदेत नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. दरम्यान यात एक चर्चेचा विषय झाला तो म्हणजे नवनिर्वाचित खा. निलेश लंके यांनी घेतलेली शपथ. याचे कारण असे की त्यांनी ही शपथ इंग्रजीतून घेतली.

त्यामुळे मतदार संघात हा चर्चेचा विषय झाला. याचे कारण असे की प्रचारादरम्यान, इंग्रजी बोलण्यावरून माजी खा. सुजय विखे यांनी निलेश लंके यांना टोमणा मारलेला होता. त्यामुळे आता इंग्रजीत शपथ घेत त्यांनी पुन्हा एकदा विखेंवर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या नंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

नेमकं काय घडलं होत?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एका मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी काहीजण फक्त रिल्स करून काम केल्याचा आव आणतात पण खरे तर ‘रील’ पेक्षा रियलमध्ये विकास करणारा खासदार असावा असे ते म्हणाले होते.

त्यानंतर एक चित्रफीत दाखवली होती व यात डॉ. विखे-पाटील यांनी संसदेत इंग्रजीतून केलेले भाषणही दाखवले होते. हाच मुद्दा पकडत विखे पाटील म्हणाले होते की, मी जितके इंग्लिश बोलतो तितके समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलावं. तसे झाल्यास मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही असे त्यांनी वक्तव्य केले होते.

राम कृष्ण हरी म्हणत शेवट
खा. निलेश लंके यांनी शपथ इंग्रजीतून घेतली. परंतु त्यांनी आपल्या शपथविधीचा शेवट राम कृष्ण हरी असे म्हणत केला. यातून त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती संसदेतही जपली असे कार्यकर्ते म्हणत आहेत.

कार्यकर्त्यांचा जल्लोष
खासदार निलेश लंके यांनी शपथ घेताच त्यांच्या जनसंपर्क कार्यालय, पारनेर येथे युवा नेते दीपक लंके, पारनेर नगर पंचायतचे नगरसेवक व सहकारी मित्रांनी फटाके फोडून जल्लोष केला.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe