Ahmednagar Politics : दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देवून त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशा मागणीचे निवेदन आमदार लहू कानडे यांच्या हस्ते प्रांताधिकारी यांना नुकतेच देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे,
माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार वनिता कल्हापुरे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी आ. कानडे म्हणाले, आज दूध धंदा हा शेतीपूरक व्यवसाय राहिलेला नसून शेतमालालाच भाव नसल्याने दूध धंदा हा शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय झालेला आहे.

परंतु राज्य सरकारच्या आडमुठे व शेतकरी विरोधी धोरणांमुळे दुधाला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे दूध उत्पादकांचा चाऱ्याचा व खाद्याचा खर्चही फिटत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दूधाला ३८ ते ४० रुपये पर्यंत भाव मिळत होता. आता तो २४ ते २५ रुपये देखील मिळत नाही.
त्यामुळे दूधउत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही, दूधालाही भाव नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा. मुलाबाळांच्या शिक्षणाचे काय करावे, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. सचिन गुजर म्हणाले कि, दूधाला योग्य मिळत नसल्याने प्रचंड आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सरकारने गांभीर्याने विचार करावा.
दूध उत्पादक शेतकऱ्यास ५० रुपये हमी भाव जाहीर करावा. अन्यथा यापुढे या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी सातिष बोर्डे, सचिन जगताप, कार्लस साठे, विष्णुपंत खंडागळे, राजेंद्र कोकणे, सरपंच अशोक भोसले, सुरेश पवार, रमेश आव्हाड, अमोल आदिक, कलीम कुरेशी, मुक्तार शाहा, नानासाहेब रेवाळे, अजिंक्य उंडे,
आबा पवार, दीपक कदम, प्रताप देवरे, रज्जाक पठाण, असलम सय्यद, भैय्या शाह, मल्लू शिंदे, दीपक निंबाळकर, शंकरराव फरगडे, बापूसाहेब लबडे, मनसुख फरगडे, विजय शिंदे, बापुसाहेब शिंदे, रफिक शेख, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय नाईक, जि. प. चे माजी अध्यक्ष मिस्टर शेलार, मुदस्सर शेख, आशिष शिंदे, निखील कांबळे, सम्राट माळवदे, कल्पेश माने, प्रतिक कांबळे, रवी भांबारे आदी उपस्थित होते.