Ahmednagar Politics : आमदार निलेश लंके यांच्यावर मोठा आरोप ! फसवणूक केली…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्रिशंकू अवस्था झाल्यानंतर शहर विकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला.

सव्वा वर्षानंतर पाठिंबा दिलेल्या अशोक चेडे यांना नगराध्यक्षपद देण्याचा शब्द आमदार नीलेश लंके यांनी त्याच वेळी दिला होता. त्यांनी तो शब्द पाळला नसल्याचा आरोप शहर विकास आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत चेडे व भाजपचे नगरसेवक अशोक चेडे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरसेवक नितीन आडसूळ यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाराज झालेल्या चंद्रकांत चेडे व अशोक चेडे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका पत्रकारांसमोर मांडली.

चंद्रकांत चेडे म्हणाले, नीलेश लंके हे आमदार आहेत.त्यावेळी त्यांची राज्यात सत्ता होती. त्यांच्या माध्यमातून शहराचा विकास होईल या हेतूने आम्ही त्यांना साथ दिली. साथ देताना कोणत्याही प्रलोभनाची आम्ही अपेक्षा ठेवली नाही. लंके यांचे प्रतिनिधी चर्चेला आले त्यावेळी त्यांनी सव्वा वर्षानंतर अशोक चेडे यांना नगराध्यक्षपदाची संधी देऊ, असा शब्द दिला.

बैठकीतही त्यांनी हे मान्य केले होते. सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर विजय औटी यांनी राजीनामा दिल्यानंतर सुपा येथे पार पडलेल्या बैठकीत दिलेला शब्द पाळण्याची ग्वाही लंके यांनी दिली होती. नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र ऐनवेळी त्यांनी शब्द फिरविला, अशी टीका चंद्रकांत चेडे यांनी केली.

आजी-माजी आमदारांनी फसवले

मागील पंचवार्षिकमध्ये माजी आमदार विजय औटी यांनी आपणास नगराध्यक्षपदाचा शब्द दिला होता. मात्र त्यांनी नगराध्यक्षपद सोडा साध्या समितीचे सभापतिपदही दिले नाही. यावेळीही अशोक चेडे यांना नगराध्यक्षपदाची संधी देऊ, असा शब्द नीलेश लंके यांनी दिला होता. त्यांनीही हा शब्द पाळला नसल्याची खंत चंद्रकांत चेडे यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe