माझं प्राजक्तकडे पण प्राजक्तचे जयंत पाटलांकडेच लक्ष ! अजितदादांचा विधानसभा सभागृहात टोला, पहा काय घडलं..

प्राजक्तकडे माझे चांगले लक्ष आहे पण तो माझ्यापेक्षा जयंतकडे अधिक लक्ष देत आहे", असा टोला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार यांनी लगावला. त्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला. माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी तालुक्यातील विविध विषयावर बोलत होते

Pragati
Published:
tanpure

Ahmednagar Politics : प्राजक्तकडे माझे चांगले लक्ष आहे पण तो माझ्यापेक्षा जयंतकडे अधिक लक्ष देत आहे”, असा टोला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार यांनी लगावला. त्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला. माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी तालुक्यातील विविध विषयावर बोलत होते.

त्यात त्यांनी शहरातील रमाई आवास योजना, घरकुल योजना, कृषी खात्याच्या वतीने दिले जाणारे विविध अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. तालुक्यात बिबट्याचा प्रश्न, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, तसेच गावोगावी महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा व इतर विजेच्या प्रश्नसह अर्थ संकल्पीय अधिवेशनात

मतदारसंघातील विविध कामांच्या संदर्भात निधीची मागणी करूनही विरोधी आमदारांना याबाबत सरकारकडून टाळले जात असून याकडे कोणाचेही लक्ष नाही, असे उच्चारताच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लगेच टिप्पणी करत माझे प्राजक्तकडे लक्ष आहे पण त्याचे जयंतकडेच जास्त लक्ष असल्याचे सांगितले.

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असून त्यात आमदार तनपुरे हे शरद पवार यांच्या बरोबर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे असून ते त्यांच्या बरोबर असल्याने अजितदादा यांनी त्यांना टोला लगावला.

ग्रामीण रुग्णालय राहुरीतच सुरू करू : आरोग्यमंत्र्यांचे उत्तर
राहुरीचे ग्रामीण रुग्णालय शहराच्या बाहेर नेण्याचा घाट काहींनी चालवला आहे, याबाबत माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करताच आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांनी शहरातील ग्रामीण रुग्णालय हे शहराच्या बाहेर नेण्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नसून जागा उपलब्ध करून दिल्यास तिथे रुग्णालय सुरु करू व याबाबत वेळ पडल्यास ताबडतोब बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

विधानसभेत बोलताना आमदार तनपुरे यांनी राहुरी शहरात असलेले ग्रामीण रुग्णालय हे तात्पुरते अन्यत्र हलविण्यात आले असून रुग्णालयाच्या जागेबाबत काही कायदेशीर बाबी होत्या. त्या गेल्या २/३ वर्षात मार्गी लावल्या आहेत. जागेचा प्रश्नसुद्धा मार्गी लागला असल्याने रुग्णालय शहरात व्हावे.

कारण या रुग्णालयात येणारे रुग्ण गोरगरीब सर्वसामान्य कुटुं‌बातील असून जाण्या येण्याच्या दृष्टीने सोयीचे आहे. त्यात शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने हे रुग्णालय शहराबाहेर नेणे योग्य नाही; परंतु हे रुग्णालय शहराच्या बाहेर ३ ते ४ किलोमीटर लांब नेण्याच्या हालचाली सुरु आहेत.

या प्रश्नाबाबत मागील अधिवेशनात महसूलमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासित केले होते; पण बैठक होऊ शकली नाही. तेव्हा या विषयावर पुन्हा प्रश्न उपस्थित केला असून याबाबत मला मार्गदर्शन मिळावे, असे आमदार तनपुरे म्हणाले. त्यास आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांनी वरील उत्तर दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe