मविआमध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी संदीप कोतकर यांचे नाव चर्चेतच नाही ; शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कळमकर यांचे विधान चर्चेत

मविआ आणि महायुती या दोन्ही गटातील घटक पक्षांनी मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनचं तयारी सुरू केली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मोर्चे बांधणी केली जात आहे. हीच शिवस्वराज्य यात्रा आज 26 सप्टेंबर रोजी नगर शहरात दाखल होणार आहे. मात्र यावेळी शरद पवार गटातील गटबाजी उघड झाली आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आगामी निवडणुकीसाठी आत्तापासूनच दंड थोपटायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अजून जागावाटप ठरलेले नाही. पण, तत्पूर्वी इच्छुकांनी रंगीत तालीम सुरू केली आहे.

मविआ आणि महायुती या दोन्ही गटातील घटक पक्षांनी मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनचं तयारी सुरू केली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मोर्चे बांधणी केली जात आहे. हीच शिवस्वराज्य यात्रा आज 26 सप्टेंबर रोजी नगर शहरात दाखल होणार आहे. मात्र यावेळी शरद पवार गटातील गटबाजी उघड झाली आहे.

जिल्ह्यात शरद पवार गटात आपापसात मतभेद असून यामुळेच की काय पक्षातील दोन बड्या नेत्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन यात्रेच्या नियोजनाची माहिती जनतेसमोर मांडली आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर आणि तसेच डॉक्टर अनिल आठरे यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा आयोजित केल्या होत्या.

यावरून शरद पवार गटात अंतर्गत शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी दहा वाजता नंदनवन लॉन्स मध्ये शिवस्वराज्य यात्रा होणार असल्याने याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

यावेळी कळमकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कळमकर महाविकास आघाडीकडून माजी महापौर संदीप कोतकर यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चे विषयी सुद्धा बोललेत. कळमकर म्हणालेत की, कोतकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे कुठेही ऐकले नाही किंवा वाचले नाही.

म्हणून कोतकर यांना महाविकास आघाडी उमेदवारी देण्यास उत्सुक नाही का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, कळमकर यांनी महाविकास आघाडी अंतर्गत तीन पक्षांच्या इच्छुकांची एकत्रित बैठक ज्येष्ठ नेते दादा कळमकर व प्रा. शशिकांत गाडे यांनी घेतली असून ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचे सर्वांनी एकमताने आणि पूर्ण ताकतीने काम करण्याचे ठरवण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

तसेच या चौकटीच्या बाहेरील विषय आमच्यासमोर नसतात, ते विषय पक्षश्रेष्ठींच्या स्तरावरील असतात असे म्हणतं कोतकर यांच्या संभाव्य उमेदवारीचा चेंडू हा पक्षश्रेष्ठींच्या मैदानात पास केला आहे. यामुळे आता माजी महापौर संदीप कोतकर यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळते की नाही हे येणारा काळचं सांगणार आहे. तत्पूर्वी मात्र शरद पवार गटातील गटबाजी उघडकीस आली आहे. कळमकर आणि आठरे यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्याने पक्षात गटबाजी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान कळमकर यांना डॉक्टर आठरे यांना यात्रेची माहिती देण्याचा अधिकार आहे का ? ते शहर कार्यकारिणीत पदाधिकारी आहेत का ? असे सवाल विचारले असता त्यांनी डॉ. आठरे पदाधिकारी नाहीत. मात्र, पक्षात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना यात्रेविषयी अधिकची माहिती पत्रकारांना द्यावयाची असेल म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली असेल असं म्हणतं याबाबत तुम्ही त्यांनाच विचारा असे स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe