‘आम्ही संगमनेरमध्ये उभं राहावं, ही जनतेची इच्छा आहे. इथं तुमच्या…..’ बाळासाहेब थोरात यांच्या आव्हानाला ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सडेतोड उत्तर

थोरात या विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विजयी झाले आहेत. म्हणजेच त्यांनी तब्बल 40 वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलंय. संगमनेर म्हणजेच थोरात आणि थोरात म्हणजेच संगमनेर हे समीकरण संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे. संगमनेर मध्ये गत चाळीस वर्षात थोरात यांना आव्हान देणारे कुणीच उदयास आलेले नाही. मात्र यावेळी ची निवडणूक काटेदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. त्यातल्या त्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला.

थोरात या विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विजयी झाले आहेत. म्हणजेच त्यांनी तब्बल 40 वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलंय. संगमनेर म्हणजेच थोरात आणि थोरात म्हणजेच संगमनेर हे समीकरण संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे.

संगमनेर मध्ये गत चाळीस वर्षात थोरात यांना आव्हान देणारे कुणीच उदयास आलेले नाही. मात्र यावेळी ची निवडणूक काटेदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोरात यांना आपला गड शाबूत राखणे यावेळी थोडेसे अवघड होईल असे मत जाणकार लोक सुद्धा व्यक्त करत आहे.

कारण की यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे संगमनेर मधून दंड थोपटतांना दिसणार आहेत. एकीकडे सुजय विखे हे संगमनेर मधून उमेदवारी करणार अशा चर्चा सुरू आहेत, किंबहुना त्यांनी यासाठी तयारी देखील सुरू केली आहे.

तर दुसरीकडे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील ऐवजी त्यांचे पिताश्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथून निवडणुकीसाठी उभे राहावे असे आव्हान केले आहे. दरम्यान आता थोरात यांच्या या आव्हानाला राज्याचे महसूल मंत्री आणि शिर्डी विधानसभा मतदार संघातील आमदार भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणतात राधाकृष्ण विखे पाटील

थोरात यांच्या आव्हानाला उत्तर देताना विखे पाटील यांनी राधाकृष्ण विखे यांनी, ‘आम्ही संगमनेरमध्ये उभं राहावं, ही जनतेची इच्छा आहे. इथं तुमच्या ईच्छेला महत्त्व नाही. मतदारसंघ कोणाची जबाबदारी नाही, तो जनतेचा आहे.

ही काय प्रायव्हेट कंपनी नाही. कोणाच्या नावे ताम्रपट लिहिलेलं नाही,’ असा खरमरीत टोला लगावला आहे. यामुळे थोरात यांचे आव्हान आणि आता विखें यांच्या प्रत्युत्तराची सध्या अहमदनगर मध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच पुढे बोलताना विखे पाटील यांनी थोरात यांनी स्वतः निवडून येण्याचं पाहाव. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराची काळजी करण्याचं कारण नाही.

तशी काळजी जर ते करत असतील, तर त्यांना भाजपमध्ये यायचं आहे का ? असा खोचक सवाल देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. यामुळे सध्या या जुगलबंदीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe