Ahmednagar Politics : विधानसभेला नगरमधून पंकजा मुंडे विरोधात आ. संग्राम जगताप लढत? भाजपच्या ‘त्या’ मागणीने गणिते बदलली

Pragati
Published:
munde jagatap

Ahmednagar Politics : अहमदनगर शहराची विधानसभा आता रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. कारण या जागेवर सध्या अजित पवार गटाचे आ. संग्राम जगताप आमदार आहेत. परंतु आता शहर भाजप देखील या जागेची मागणी करत असल्याची चर्चा आहे..

त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपकडून नगर शहर विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. येणारी विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे यांनी अहिल्यानगर शहरातून लढवावी अशी मागणी आता भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी केलीये.

त्यांनी असे म्हटले आहे की, लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी आता खचता कामा नये. त्यांनी आता विधानसभा निवडणुकी तयारी केली पाहिजे. सध्या लोकसभेचा निकाल पाहता डॉ. सुजय विखे यांना नगर शहरातून मताधिक्य मिळाले असल्याने शहरात भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण असल्याचे ते म्हणाले.

आता यानंतर होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग शहर भाजपने बांधला असल्याने पंकजा मुंडे यांच्यासारख्या सर्वमान्य चेहऱ्यास नगरमधून विधानसभा निवडणूकीचे तिकीट दिल्यास त्या निश्चितच विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून पंकजा मुंडे यांना नगरमधून तिकीट देण्याची मागणी त्यांनी केल्याची माहिती समजली आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कायम नगर शहरावर प्रेम केले असून त्यांचा नगरशी जिव्हाळ्याचा संबंध होता व आता त्यांच्या कामाचा वारसा पंकजा मुंडे या पुढे नेत असल्याने त्यांना तिकीट द्यावे अशी मागणी केली आहे.

आ. जगतापांचे काय?
सध्या महायुती असल्याने नगरची जागा आ. संग्राम जगताप यांना जाईल हे निश्चित. परंतु जर भाजपने पंकजा मुंडे यांना उभे केले तर मग जगतापांचे काय? अशी चर्चा सुरु आहे. जर महायुती राहिली नाही तर मग मुंडे विरोधात जगताप अशी लढत होईल का? अशी चर्चा सध्या रंगलीय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe