Ahmednagar Politics : विधानसभेच्या अनुशंघाने प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून अनेक मतदार संघात इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. श्रीगोंदेत आता महाविकास आघाडीमध्येच लढाई दिसण्याचे संकेत आहेत. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन कार्यक्रमात उपनेते साजन पाचपुते यांनी ही जागा ठाकरे गटाला मिळेल व मी विधानसभा लढवील अशी इच्छा व्यक्त केली होती.
दरम्यान आता खा. निलेश लंके यांनी श्रीगोंद्यातील एका कार्यक्रमात माजी आमदार राहुल जगताप हे विधानसभेचे उमेदवार असतील असे म्हटले आहे. त्यामुळे आता येथे महाविकास आघाडीकडून कुणाला संधी मिळणार? साजन पाचपुते की राहुल जगताप? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
“डबल” इंजिन द्या
श्रीगोंदेकरांनी मोठी आघाडी देत मला निवडून आणले. आपण विकासकामे, तर करणार आहोतच. त्या कामांना अधिक गती ‘देण्यासाठी माजी आमदार राहुल जगताप यांना येत्या विधानसभा निवडणुकीत विजयी करीत विकासाला “डबल” इंजिन द्या, असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले. तालुक्यातील देवदैठण येथे नवनिर्वाचित खा. नीलेश लंके यांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी खा. लंके बोलत होते.
काय म्हणाले खा. लंके ?
श्रीगोंदे तालुक्यातील जनतेने जे मताधिक्य दिले, त्यातून उतराई होणे शक्य नाही. पण ज्या हेतूने मतदान केले, तो हेतू तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा शब्द नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी श्रीगोंदे तालुक्यातील येळपणे जिल्हा परिषद गटातील सत्कार सोहळ्यात बोलताना दिला. खासदार नीलेश लंके यांचा सत्कार तसेच ग्रंथतुला येळपणे गटातील देवदैठण येथे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
त्यावेळी खासदार लंके बोलत होते. लंके म्हणाले, पारनेर आणि श्रीगोंदेने मला मोठे मताधिक्य दिले. पारनेरमध्ये गेली साडेचार वर्षांत विकासकामे केली आहेत. परंतु, श्रीगोंदेत माझे कोणतेही विकासकाम नसताना तुम्ही मला ३२ हजार मतांचे निर्णायक मताधिक्य दिले. श्रीगोंदेकरांनी दिलेल्या प्रेमातून कधीही उतराई होणार नाही.
आता श्रीगोंदेकरांनी मोठी आघाडी देत मला निवडून आणले. आपण विकासकामे, तर करणार आहोतच. त्या कामांना अधिक गती ‘देण्यासाठी माजी आमदार राहुल जगताप यांना येत्या विधानसभा निवडणुकीत विजयी करीत विकासाला “डबल” इंजिन द्या, असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले.