अहमदनगरमध्ये ‘या’ पक्षाची एंट्री, विधासनभेला ९ आमदार उभे करणार, अनेकांचे गणिते बिघडणार

आगामी विधासभा आता तोंडावर आलेल्या आहेत. त्या अनुशंघाने अहमदनगरमधील राजकारण हळूहळू बदलू लागले आहे. आता राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ पैकी ९ विधानसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढविण्यात येणार असल्याची माहिती

Pragati
Published:
ahmednagar

Ahmednagar Politics : आगामी विधासभा आता तोंडावर आलेल्या आहेत. त्या अनुशंघाने अहमदनगरमधील राजकारण हळूहळू बदलू लागले आहे. आता राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ पैकी ९ विधानसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढविण्यात येणार असल्याची माहिती रासपचे जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच पिंपरी चिंचवड येथे संपन्न झाली. त्यात राज्यात १०४ तर अहमदनगर जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघात पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे ठरवले आहे. जिल्ह्यात कर्जत,

संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर या विधानसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक रिंगणात उतरणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची राज्यात मोठी ताकद असून जिल्ह्यातही चांगले संघटन आहे, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे सातत्याने शेतकऱ्यांच्या व वंचितांच्या प्रश्नांसाठी लढत असतात,

त्यांनाही मोठा जनाधार आहे म्हणूनच पक्षाने स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अद्याप तरी कोणाशी युती किंवा आघाडी करण्याची चर्चा झालेली नाही, त्यामुळेच प्राथमिक स्तरावर १०४ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात येणार आहे आहे, असे कुंडकर यांनी सांगितले.

त्यामुळे आता अनेक दिग्गजांना हे मोठे आव्हान ठरेल असे दिसते. अनेकांचे गणिते यामुळे चुकूही शकतात असे चर्चिले जाऊ लागले आहे. नेमकी काय गणिते आता रासपच्या भूमिकेने उभी राहतील हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe