Ahmednagar Politics : बीडच्या राजकारणाचा शेवगाव-पाथर्डी वर प्रभाव ! विधानसभेला कुणाची ताकद दिसेल? प्रताप ढाकणे, राजळे की घुले? पहा..

Pragati
Published:
ghule

Ahmednagar Politics : नुकत्याच लोकसभा निवडणूक पार पडल्या व यातून अनेक गणिते समोर दिसू लागली. यातून राजकीय मुद्देही काही प्रमाणात स्पष्ट होऊ लागले. याचा विधानसभेशीही ताळमेळ जोडला जाऊ लागला. अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या व जातीय समीकरणाच्या बाबतीत महत्वपूर्ण असणाऱ्या शेवगाव पाथर्डीची गणितेही जुळवली जाऊ लागली.

या निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना केवळ साडेसात हजारांच्या आसपास मतांची आघाडी मिळाल्याने येथून पुढील काळात तालुक्यातील राजकीय संघर्ष आणखी टोकदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे मताधिक्य (मागीलवेळी पेक्षा घटलेले) भाजपच्या आ. मोनिका राजळे व या निवडणुकीत डॉ. विखे यांना सहकार्य करणारे अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.

तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे यांचा हुरूप वाढवणारे आहे. बीड लोकसभा मतदार संघात उघड-उघड मराठा विरुद्ध ओबीसी असा प्रचार झाला. त्याचा प्रभाव शेवगाव-पाथर्डी विधान सभा मतदार संघातही जाणवला. कारण शेवगाव व पाथर्डी हे दोन्ही तालुके बीडच्या सीमेवर असून, तेथील प्रचाराचे परिणाम येथेही दिसून आले. या मतदार संघातील मराठा बहुल बहुतांश गावात लंके यांना आघाडी मिळाली तर वंजारी व ओबीसी बहुल असणाऱ्या गावात विखे यांना आघाडी मिळाली असल्याचे चित्र आहे.

विखे यांना कायम पाठिंबा देणारा मतदारसंघ, अशी या मतदारसंघाची ओळख आहे. मागील निवडणुकीत विखे यांनी संग्राम जगताप यांच्या विरोधात ६१ हजार मतांचे मताधिक्य घेतले होते. या निवडणुकीत मागील मताधिक्यापेक्षा निम्मे तरी मताधिक्य विखे घेतील, अशी अपेक्षा होती. परंतु परस्पर विरोधात असणारे आमदार मोनिका राजळे व माजी आमदार चंद्रशेखर घुले हे दोन्ही गट विखे यांच्यासाठी एकत्र येऊनही मताधिक्य अपेक्षे एवढे मिळाले नाही.

याउलट विखे यांचा वारू मतदारसंघात रोखण्यात प्रताप ढाकणे यांना चांगले यश आल्याने आगामी काळात राजळे, घुले व ढाकणे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो. या निवडणुकीत काही प्रमाणात मराठा समाज, मुस्लिम व दलित समाजाची एकगठ्ठा मते लंके यांच्या पारड्यात पडल्याने विखे यांची आघाडी कमी झाली. तालुक्यात ऊसतोड मजुरांची संख्या लक्षणीय असून, या मजुरांवर स्व. गोपीनाथ मुंडे यांचा मोठा प्रभाव असल्याने पंकजा मुंडे यांची सभा झाली की हे मजूर भाजपच्या पाठीशी उभे राहणार, हा आजवरचा इतिहास आहे.

या वेळी मात्र या मजुरांची मते बऱ्यापैकी फोडण्यात ढाकणे यांना यश आले असल्याचे विश्लेषक सांगतात. आगामी विधान सभेचा विचार करता आ. मोनिका राजळे, प्रतापराव ढाकणे, मा.आ.चंद्रशेखर घुले, हर्षदा काकडे हे उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. मागील लोकसभेला भाजपचे डॉ. सुजय विखे यांना या विधानसभा मतदार संघात ६० हजारांचे मताधिक्य होते तर

त्यानंतर ५ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांना १३ हजारांचे मताधिक्य मिळाले. लोकसभा व विधानसभा निवडणूक वेगळी असली तरी लोकसभेचा प्रभाव विधानसभा निवडणुकीच्या वेळेस राहण्याची शक्यता आहे.

तसेच प्लस पॉईंट म्हणजे लंके यांना मानणारा एक वर्ग तालुक्यात असून यापुढील काळात आता लंके हे ढाकणे यांची पाठराखण करणार असल्याने ढाकणे यांची सुद्धा तालुक्यात ताकद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता आगामी काळात धाकाने-घुले-राजळे आदींसह सर्वच इच्छुकांना सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काम करावे लागणार असून यांना जनसंपर्कच तारू शकतो हे देखील तितकेच खरे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe