Ahmednagar Politics : ..वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था ! आमदारकीतील माघारीनंतर विखेंची भावनिक पोस्ट, पहा काय घडले

Pragati
Published:
vikhe

Ahmednagar Politics : मागील काही दिवसांपासून नाशिक शिक्षक मतदार संघाची निडणूक जोरदार चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान यातून सर्वात चर्चेत राहिलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांनी मात्र माघार घेतली आहे.

परंतु यातून काही नाराजीनाट्य रंगणार का ? याच्या चर्चा सुरु झाल्यात याचे कारण म्हणजे या माघारी नंतर राजेंद्र विखे यांनी केलेली एक फेसबुक पोस्ट. त्यांनी आपल्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एक शायरी लिहली असून यातून अगदी सूचक असा मॅसेज दिला गेला आहे. “शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोका खा गया, वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था!”, असे त्यांनी यात म्हटलेय.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात विधान परिषदेसाठी २१ जण रिंगणात उरले आहेत. तब्बल १५ जणांनी उमेदवारी अर्ज आज माघारी घेतले. येत्या 26 जूनला या निवडणुका होत आहे. विवेक कोल्हे, अप्पासाहेब शिंदे व भाऊसाहेब कचरे यांच्यासह तब्बल नऊ नगरकरांचा समावेश आहे. शिवसेनेने किशोर दराडेंना उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेने (ठाकरे गट) अॅड. संदीप गुळवेंना संधी दिली आहे. दरम्यान यातून सर्वात चर्चेत राहिलेल्या डॉ. राजेंद्र विखे यांनी मात्र माघार घेतली आहे. त्यानंतर काहीवेळातच राजेंद्र विखे-पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली व ती चांगलीच व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली.

काय आहे विखे यांची शायरी
राजेंद्र विखे-पाटील यांनी फेसबुक पोस्ट केलीये. ही एक शायरी वजा संदेश असून “शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोका खा गया; वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था!” असे यात म्हटले गेले आहे.
त्यामुळे या निवडणुकीतील उमेदवारीबाबत राजेंद्र विखे- पाटील यांना अनपेक्षित असे काही करावे लागले का?

त्यांना ऐनवेळी माघार घेण्यास भाग पडले गेले का? त्यांच्या नाराजगीचा रोख कुणाकडे आहे? असे अनेक प्रश्न सध्या समोर उभे राहिले आहेत. राजेंद्र विखे यांनी फेसबुकवर ही पोस्ट करत मनातील खदखद मांडली आहे का? राधाकृष्ण विखे-पाटील यावर काही बोलतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe