Ahmednagar Politics : वंचितचा पुन्हा दणका ! अहमदनगरमध्ये रूपवतेंना ‘या’ मतदारसंघातून विधानसभेला उभे करणार

नुकत्याच झालेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे माजी खा. लोखंडे व वंचितकडून उत्कर्ष रुपवते उभ्या होत्या.

Pragati
Published:
utkarsha rupwate

Ahmednagar Politics : नुकत्याच झालेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे माजी खा. लोखंडे व वंचितकडून उत्कर्ष रुपवते उभ्या होत्या.

या निवडणुकीमध्ये तरुण तडफदार महिला नेतृत्व उत्कर्षा रूपवते यांनी केलेली कामगिरी व संघटन पाहता आता पक्षाने त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच त्यांना आमदारकीसाठी देखील उतरवले जाण्याची शक्यता आहे.

उत्कर्षा रूपवते यांचा जनसंपर्क, प्रभावी वक्तृत्व, शैक्षणिक पार्श्वभूमी व मतदार संघातील विविध समस्यांचा त्यांनी घेतलेला आढावा याची चुणूक दाखवली होती. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना पक्षाच्या प्रवक्ते पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत रूपवते यांनी श्रीरामपूर विभागातून मिळवलेल्या मतांची संख्या पाहता त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाल्याचे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत उत्कर्षा रूपवते या बहुजन वंचित आघाडीच्या श्रीरामपूर विधानसभामतदार संघाच्या उमेदवार असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

याशिवाय लवकरच राज्य कार्यकारिणीत आणखी एका विशिष्ट अशा महत्वपूर्ण पदावर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता पक्ष वर्तुळात वर्तवली जात आहे. एकूणच लोकसभेतील पक्षाच्या सक्षम बांधणीचा फायदा रूपवते यांना होणार असल्याचे दिसते.

नगर उत्तर विभागामध्ये श्रीरामपूर हा सर्वात मोठा मतदार संघ असून लोकसभा निवडणुकीमध्ये रूपवते यांना श्रीरामपूरमध्ये २३ हजार मतदान मिळाले होते हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आता आगामी विधासनभेला श्रीरामपूरमध्ये उत्कर्ष रुपवते मोठी फाईट देऊ शकतात असे चित्र आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe